विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८
Courage thy name is woman...!
Hat's off to Major Kumud Dogara's strong hearted & self-discipline duty towards nation as Major Kumud Dogra can be seen attending her martyr husband's funeral in the Army uniform along with her 5 days daughter.
Wife of a deceased IAF officer Wg Cmdr Dushyant Vats displayed exemplary & rare epitome of courage.
RIP Wg Cmdr Dushyant Vats
शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८
लिंक आधार टू निराधार ....
'भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा' ही म्हण मी नुसती ऐकली होती मात्र कमीतकमी गरजेचे वर्णन करणे अन् ती अनुभवणे किंबहुना भोगणे हे कल्पनातित आहे.
आज वर्तमानपत्रातील एका वृद्ध दांपत्याविषयी बातमी वाचली अन् मन हेलावून गेलं. सोलापूरातील श्रमिक वसाहतीत राहणाऱ्या माचर्ल वृद्ध दांपत्यांनी गरीबी व शारीरिक असमर्थते मुळे चक्क कोळसा खाल्ला...! मी कधी विचारही करू शकत नाही इतकी वाईट अन् हताशाजनक कृती एखादा हतबलपणे करू शकतो.
संजय गांधी निराधार योजनेमुळे त्यांची सुरवातीची काही वर्षे बरी गेली परंतू काही तांत्रिक कारणामुळे ती बंद झाली ती पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी खेटे घालूनही त्यांच्या हाती निराशाच आली अन् सरतेशेवटी हाती कोळसा घ्यावा लागला हे समाज म्हणून आपले अपयश आहेच पण त्याही पेक्षा व्यवस्था कशी रेड्यावर पाऊस पडल्याप्रमाणे वागते तसेच केवळ कागदोपत्री खर्डेघाशी करण्यात कामकाजपुर्तीचे समाधान मानत मनाशी मनाचे लिंकींग न का होवो पण तांत्रिक आधार लिंकचा आग्रह मात्र केला जातो इतकचं.
पण कोळसा कितीही उगळला तरी काळाच त्याप्रमाणे लाखो कोटीचा कोळसा घोटाळा एकवेळ पचवतील पण एखाद्याला खराखुरा कोळसा पचवताना शरीरापेक्षा मानसिक दृष्ट्या किती जड गेले असेल हे अधिक मन सुन्न करणारे आहे.जोपर्यंत या व अशाप्रकारच्या घटना आजुबाजूला घडत असतील तोपर्यंत प्रगतीशील, विकास हे शाब्दिक बुडबुडेच ठरतात.
लहानपणी मुलांना चांगल्या संगोपनासाठी आईवडिलांची गरज असते अन् पुढे वृद्धापकाळात त्यांना मुलांच्या आधाराची गरज भासते परंतू सगळ्यांनाच ती मिळतेच असे नाही.तेव्हा कौटुंबिक आधार सरकारी अथवा सामाजिक आधारा इतकाच किंबहुना त्याहून अधिक महत्वाचा असतो.तो प्रत्येकाने जपण्याचा व जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे तरच निराधार करणारी लिंक तुटेल.
मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८
वरकरणी...
आजकाल कुणीही तथाकथित छिंदम पदाधिकारी कोणत्याही विषयी काहीही बोलतो अन् ते महापुरुष अथवा धर्म या विषयी असेल तर समाजीक जाणीवा किती पोकळ अन् दांभिक आहेत याचीच साक्ष देतो.
माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार समाजातील बहुतांश लोकं याच छिंदम प्रवृत्तीची तोंड देखले अन् सोयीस्कर बोलणारे व वागणारे असतात.
भिन्न जात-धर्म,संस्कृती तसेच हजारो वर्षांचा इतिहास असणारा भारत तांत्रिक लोकशाहीचा मान राखत लादल्या गेलेल्या सार्वभौमाचा वरकरणी स्वीकार करत सर्वधर्म समभाव,बंधुभावाचा मुखवटा घालून प्रार्थनेतील परंपरेचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव कसले प्रयत्न करतात हे न उलगडणारे कोडेच आहे मग एखाद्याचा मान ठेवने,सौजन्याने वागने व निष्ठा राखणे दुरच.
मताचा जोगवा मागताना जिकडे गुलाल तिकडे चांगभलं म्हणत मनातील वैयक्तिक अनादर,द्वेषपूर्ण विचार झाकून केवळ हो ला हो म्हणत त्या त्या जाती धर्मातील महापुरुषांच्या तसबीर अथवा पुतळ्याला हार तुरे घालत जयजयकाराच्या घोषणा देत वेळ मारून न्यायची मानसिकता त्यांच्यातील स्वार्थी अपरीहार्यताच दर्शवते.
कोणत्याही महापुरुषाला जात नसते असते ती फक्त सकल समाजाच्या उद्धाराची महत्वाकांक्षा परंतू त्या त्या महापुरुषाला त्या त्या समुहाला चिटकवत त्यांच्या भावनेला हात घालत आपलसं करण्याचा राजधर्म मात्र नेटाने पाळला जातो.
लोकं सुद्धा पेहराव,आभुषणं,अदब,चलचित्रातील भारावून टाकणाऱ्या दृष्य परिणामाच्या प्रभावात वावरतात अन् प्रतिकात्मक पुजा आर्चेलाच सर्वस्व मानत अनुनय केला जातो.परंतू सद्यस्थितिला समाजाचा उद्धार करण्यासाठी आवश्यक विचारधारेचं काय.एकाच समुहातील माणसे महापुरुषाच्या जन्म तिथीवरून देखिल एकवाक्यता दाखवू शकत नसतील तर भिन्न जाती धर्माच्या लोकांचा मेळ कधी लागणार.
महापुरुषांच्या जयंत्या तसेच धार्मिक उत्सव साजरे करणारे त्यांच्या विचारधारा किती आभ्यासतात.त्या त्या धर्मावर अथवा व्यक्तिमत्वावर गाढ श्रद्धा असणारे त्या त्या धर्मग्रंथाचे अथवा चरित्राचे किती वाचन करतात याचे उत्तर ९९.९९% नाही असण्याची शक्यताच अधिक आहे हे बोचरे वास्तव स्विकारण्याचे धाडस आपल्यात नाही ही खरी शोकांतिका.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

