बुधवार, १८ जुलै, २०१८

Charlie Chaplin


         To show the way how to overcome poverty, sorrow & discomfort in terms of humour to humanity King of tragedy turned oneself to the King of comedy thy name is Charlie Chaplin who says humour is sense of survival & preserve our sanity. We think too much & feel too little,  more than machinery we need humanity, more than cleverness we need kindness, gentleness without those qualities life will be violent & all ll be lost.
Humour & humanity r binding elements although man's humanity to man is greater than his inhumanity.




          

गुरुवार, १२ जुलै, २०१८

#MISSIONIMPOSSIBLE


         
           Elite foreign divers & Thai Navy SEALS lead by Narongsak Osatanakorn successfully rescued 12 Thai boys of Wild boars soccer team & their coach Ekkapol Ake Chantawong who is former Buddhist monk.
They entered into the Thai cave "Tham Luang"  situated in Northern Thailand on 23rd Jun & trapped several km inside it till 10th July. Rescue operators entered thru twisting narrow & jagged passageways that in some places are completely flooded like cafe latte water. After a short deluge of rain with more bad weather forecast, authorities had to act immediately. The extremely dangerous operation to extract all of them on its final day which is named as D-Day.
Pheerapate nickname 'Night' who celebrated 16th birthday with their team members in the cave reflects positive approach towards tough situation.
Hat's off to all the rescue team members including the deceased martyr Saman Gunam for their extraordinary deeds.











सोमवार, ९ जुलै, २०१८

मानसिक गुलामगिरीची नांदी....!



          आजच्या दिवसातल्या दोन बातम्या भविष्यातील गंभीर धोक्याची घंटा आहेत यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
पहिली बातमी म्हणजे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात माऊलींच्या पायावर डोकं ठेवण्याचा कार्यक्रम उरकल्या नंतर भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना केलेले मार्गदर्शन. त्यावेळी त्यांनी तुम्हाला तुमचा (प्रत्यक्षात यांचाच ) हेतू साध्य करायचा असेल तर तुमच्या पोस्ट , मॅसेजेस या टोकदार असल्या पाहिजेत असा शहाजोग सल्ला दिला तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सायबर योद्धा होण्याचा मंत्र देखिल दिला आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार येणारा काळ सायबर युद्धाचा आहे. वरवर यात तथ्य असले तरी जो बागुलबुवा निर्माण करून अनिष्ट प्रथेला खतपाणी घालण्याचाच जो प्रकार घडत आहे त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत . कारण आधीच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला आपल्याला हवे तसे वापरण्यासाठी तथाकथित तज्ञांच्या फौजा तयार करण्याचा घाट उघडपणे घातला जातोय. अन् अशा फौजांच्या सेनापतीचे मनसुबे राष्ट्रहितापेक्षाही स्वहिताचेच अधिक आहेत हे ही न समजण्या इतके तांत्रिक प्रगत मानवी रोबॉट लढण्यासाठी सज्ज होतायत अन् याला (सत्ता अभिलाषी) मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नेहमीप्रमाणे मम् म्हणतात हा येणारा काळ कीती धोकादायक आहे हेच सुचित करतो. यांच्या उत्तराला तशाच प्रत्युत्तराने सामना करण्यासाठी इतर पक्ष देखिल आपसूकच या आभासी युद्धात ओढले जाणार शेवटी काय स्वतः विचार न करणाऱ्यांचे मेंदू काबीज करणारे मास्टर माइंड आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या मतावरच विजय मिळवित जनाधाराच्या गप्पा मारत लोकशाही चिरायु होवोच्या घोषणा देणार. यात 3 जी बी डाटा रोज उपलब्ध करणाऱ्यांची नुसती बोटंच नाहीतर आख्खी मुठच तुपात असणार अन् आपण या मुठीत घुसमटत असू हे वेगळे सांगायला नको.
आता दुसरी बातमी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील. याठिकाणी आय पी एस प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येते. नुकताच येथील प्रशिक्षणार्थीचा निकाल लागला एकुण १२२ पैकी ११९ जण अनुत्तीर्ण सोप्या भाषेत नापास झालेत. तरी देखील ही मंडळी प्रोबेशनवर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे म्हणजे लाल शेरा मारून देखिल वरच्या वर्गात ढकलण्यात आल्या सारखे झाले. नापास होणे इतपर्यंत ठिक पण त्यांचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड होय मग अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून (भविष्यात येथे लातूर पॅटर्नचे गँगस्टर दिसू नये म्हणजे मिळवली ) निघणारे तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांचे भरघोस पीक जर सत्वहिन असेल तर शासन ज्यांच्यासाठी कार्यरत असते त्यांचे खरचं भले होणार आहे का अन् मग हीच मंडळी सामाजिक धोक्यांना पुरून उरणारेत का केवळ पदाचा टेंभा मिरवणारेत.
एकीकडे अति महत्त्वाकांक्षी सत्ताधारी अन् दुसरीकडे कृत्रिम गुणवत्तेवर आधारित प्रशासकीय यंत्रणा यांचा समतोल राखला जाणार का त्यांची अभद्र युती होणार यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. एकीकडे अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल माध्यमांना सक्ती करणारे सरकार तशाच माध्यमाचा गैरवापर करत निरंकुश सत्ता मिळवणार असेल अन् त्यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम नसेल तर पुढचा अशाप्रकारच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा काळ  हा मानसिक गुलामगिरीची नांदीच ठरणार आहे.

संदिप महामुनी.
sandeepmahamuni.blogspot.in

सोमवार, २ जुलै, २०१८

अगतिकतेच्या टोकावर.....!



रविवार सकाळ दिल्लीतील ११ जणांच्या सामुहिक आत्महत्या तसेच संध्याकाळ धुळ्यातील राईनपाडा येथील  ५ जणांच्या सामुहिक हत्यांनी अस्वस्थ करून गेली.
माणसातील या दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका जीवन किती अनाकलनीय अन् अस्थीर झालय याचीच जाणीव अधोरेखित करतय.प्राथमिक तपासात सामुहिक आत्महत्या हे मोक्षप्राप्तीच्या विचाराधीन केलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.त्यावर त्यांच्या नातेवाईकांनी ते सर्व शिकलेले आहेत त्यामुळे अस काही करणार नाहीत अस म्हंटल आहे पण उच्च शैक्षणिक पदव्या घेणे अन् अंधश्रद्धाळू नसणे याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो तर त्याची जडणघडण कोणत्या विचारसरणीत  होते यावर ते अवलंबून असते. वरुन कितीही शांत दिसणाऱ्या जीवनाच्या अंतरंगात किती अविचारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे हे अशा काही तरी अनपेक्षित कृतीनेच समोर येते परंतू लोक त्याकडे केवळ औत्सुक्याच्या परिप्रेक्ष्यातून पाहत असतील तर काही दिवस ही बातमी चर्चेत राहते अन् कालनियमाप्रमाणे विरुन देखिल जाते.
दुसरीकडे एखादा  वॉट्स अप वरील मॅसेजचा स्वैर अर्थ काढत स्वतःच्या कल्पकतेने एखाद्याच्या बाह्य व्यक्तिमत्वावर व पेहराववर आधारित ( स्वच्छ शुभ्र पेहरावातले गुन्हेगार मात्र यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात ही खरी शोकांतिका आहे..! ) एखाद्या व्यक्ती चा संशय येणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या व्यक्तीला थेट गुन्हेगार  ठरवून त्याला स्वतःच शासन करणे अगदी कायदा व्यवस्थेला /पोलिसांना न जुमानता वेळ प्रसंगी त्यांच्यावर देखिल हल्ला करणाऱ्या सामुहिक मानसिकतेचा शोध घेणे आवश्यक आहे अन्यथा सुदृढ समाज मनाला नख लागणार यात शंका नाही. समुहाला स्वतःचा चेहरा नसतो अन् विचार ही नसतो असतो केवळ बेभानपणा. परंतू भानावर आल्यावर मात्र आपण निर्दोष लोकांचा बळी घेतला हे ध्यानात आल्यावर कुणाच्या पायावर डोकं ठेवून पापक्षालन करणारेत अन् त्यामुळे ज्यांच्या कुटुंबाचा आधारच गेलाय त्यांच्या दुःखाच काय त्यांना न्याय मिळणार आहे का अन् केव्हा अन् दोन-तीन हजारांच्या समुहातील पाच-दहा लोकांना(कोणता फार्म्युला वापरतात कुणास ठाऊक..! ) शिक्षा होऊन प्रश्न सुटणारे का? का त्यांच्या कुटुंबीयांची झालेली अपरिमित हानी भरुन येणार आहे.
वरील दोन्ही घटना माणूस केवळ माहिती ने भरलेला व भारलेला आहे इतकंच पण तो ज्ञानाने समृद्ध व जाणिवेने प्रगल्भ झालेला नाही हेच दर्शवते. हा पोकळ मानवी उत्क्रांत वाद विनाशाकडेच चालला आहे भले कुणी माकडापासून आपली निर्मिती झाली नाही म्हणो परंतू लोकंच ते आपल्या वर्तनाने खरं ठरवण्यासाठी अगतिक झाले आहेत अन् त्याच त्यांनी टोक गाठलय हेच सत्य विचारचक्र व्यापून टाकतय...

संदिप महामुनी.