सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९

#defeminism....

  
     Avoiding luxury doesn't mean to downtrodden a human being
#defeminism.... 





सत्तेचे शैय्यासोबती....

सत्तेचे शैय्यासोबती....

            महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक, त्यातील लागलेले निकाल अन् त्यातून तथाकथित स्थिर सरकार स्थापनेसाठी गेला महिनाभर चाललेले दावे-प्रतीदावे, राष्ट्रपती राजवट ते रामप्रहरीचे शपथग्रहण हे केवळ धक्कादायकच नव्हे तर उबग येऊन व्यवस्थेबद्दलची विश्वासार्हता गमावणारा घटनाक्रम आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच दिशादर्शक विचारधारा असणाऱ्या महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या राज्यात सत्तेसाठी जो आट्यापाट्या चा खेळ खेळण्यासाठी जीवाचा आटापिटा चालू आहे तो पाहता कोणतेही तत्व अन् त्यातून निर्माण झालेली विचारधारा याला कसलीही किंमत राहिलेली नाही मग कोणीही कुठल्याही पक्षात असो.काल आपण कोणत्या पक्षात होतो आज कुठल्या पक्षात आहे काल कुणासाठी घशाला कोरड पडे पर्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकली आज कुणाच्या गळ्यात गळे घालून मिरवतोय हे सर्व संग्रहीत करण्याची अद्यावत तंत्रज्ञान असताना कशाचीही तमा न बाळगता सोयीस्कर सारीपाट मांडला जातो.कारण आज अन् आत्ता केवळ याचाच हट्ट व स्वार्थ विचारात भिनला की मग नैतिकता व दूरगामी परिणाम यासर्वाला तिलांजली दिली जाते.
या सर्वाच्या मुळाशी ज्या समाजातून हे नेते तयार होतात तो समाज अर्थात जनता आहे कारण या जनतेचा पायाच भुसभुशीत तकलादू नैतिकतेवर तसेच दांभिक आदर्शवादावर आधारित आहे अन् म्हणूनच उघड उघड थिल्लरपणा करताना या लोकनेत्यांना काडीचीही शरम वाटत नाही.कारण लोकांनाच परखड ठाम कृती पेक्षा अलंकारिक, पुस्तकी वाक्यात घोळलेले तथाकथित विवेचन अपेक्षित असते.साचेबद्ध गोलमोल बोलण्यालाच सुसंस्काराचे कोंदण लाभल्यामुळे असु दे म्हणत निर्बुद्धपणे ते स्विकारले जाते.मी निष्ठेला जागून, कुणाशीही आप-पराभाव, शत्रुभाव तसेच ममत्व न बाळगता.... अशाप्रकारे शपथ घेणारे व तथाकथित उच्च पदावर कार्यरत असणारे परंतू त्या पदास नालायक असणारे असे शपथ देणारे यातून जो शपथ नावाचा सोपस्कार केला जातो यातच सर्व दांभिकपणा अधोरेखित होतो वास्तविक शपथ नावाच्या संपुर्णपणे उत्तरदायित्व व शब्दाला जागणाऱ्या अश्या गृहितकावर अधारित संकल्पनेचेच सार्वजनिक हसे झाले आहे.
जनतेचे भले करण्याची भलामण करणाऱ्या व लोकशाही रितीरिवाजाप्रमाणे निवडून आलेल्या तथाकथित लोकप्रतिनिधींची वागणूक ही सत्तेसाठी हपापलेली आहे कारण ज्याला कुणाचे भले करायचे असेल तर सत्ता ही एक माध्यम असू शकते पण एकमेव साध्य नव्हे.परंतू सत्तेच्या माध्यमातून स्वतःचा व आपल्या आप्तस्वकीयांचा जो काही आर्थिक, राजकीय फायदा साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे आसुसलेले आहेत ते पाहता सत्तेचे प्रामाणिक भागिदार होण्यापेक्षा सत्तेचे शैय्यासोबती होण्यातच धन्यता मानणारे आहेत हिच लोकशाहीची शोकांतिका आहे.


गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

निरागसपणातील दृष्टि...!


        बालपणीच्या निरागसपणातील दृष्टि मोठेपणी जेव्हा दृष्टिकोन असते तेव्हा आयुष्य हे बालसुलभ होते.