विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
मंगळवार, २८ जानेवारी, २०२०
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!
महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!
संस्काराची परिभाषा नेमकी काय असते हे तुमच्याकडे असणाऱ्या शिदोरीवर अवलंबून असते. जर का ती शिदोरी सुसंस्काराची असेल तरच तो संस्कार झळाळून निघतो अन्यथा तो झोकाळून जातो.
दोन वेगवेगळ्या बातम्या वाचताना त्याचा आज प्रत्यय आला एक म्हणजे वारकरी संप्रदायातील एका मठाधिपतीने मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाचा अध्यक्ष मीच या स्वार्थ बुद्धीने व अहंकाराने त्यानी विश्वस्तांनी ठराव करून मठाधिपती म्हणून निवडलेल्या व्यक्तीचा ठरवून चाकूने हल्ला करीत पंढरीनगरीतच खून केला विशेष म्हणजे सहकाऱ्याच्या डोक्यात विणा घातल्याच्या गुन्ह्यासाठी त्याने तीन महिन्याची तुरुंगाची हवा देखिल खाल्ली होती तसेच दोघांचे गुरु एकच असलेले बंड्यातात्या कऱ्हाडकर यांना देखील मारण्याचे त्याने ठरवले होते पण सुदैवाने ते बचावले अन् दुसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूने ( हर्षवर्धन सदगीर ) उपविजेत्या ठरलेल्या व आपला मित्र असलेल्या कुस्तीपटूला ( शैलेश शेळके ) खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली तसेच दोघेही एकाच गुरुचे चेले असल्याने शेवटी विजय गुरुचाच झाला ही प्रामाणिक भावना दोघांचीही होती.
तस पाहिल तर महाराष्ट्रीय संस्कृती मधे वारकरी अन् कुस्ती दोन्हीही अस्मितेचे प्रतिक आहेत. वारकरी संप्रदाय म्हटलं की अध्यात्मिक मार्गाने व संत परंपरेच्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर पालन करीत सामान्य जनांना उपदेश करीत समाज सुसंस्कृत घडवण्यासाठी आग्रही असणे होय तर कुस्ती म्हणजे शारीरिक ताकदी बरोबर चपळता असणारा रांगड्या गड्याचे मैदानी कौशल्य दाखवण्याची क्रिडा स्पर्धा होय.
इथे मात्र ज्याने समाजाला दिशा दाखवायची त्यानेच दिशाहीन होत अध्यात्मिक तत्वज्ञानाशी फारकत घेत वारकरी संप्रदायाची 'वरुन किर्तन अन् आतुन तमाशा' अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली. तर जिथे इर्षा, अहंकार, आक्रमकता निर्माण होण्याची संभावना अधिक तिथे संयम व नम्रता याचे प्रदर्शन दिसले. याचाच अर्थ तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो त्यापेक्षा तुमची जडणघडण कोणत्या संस्कारातून झाली आहे हेच समाजाला अधिक प्रबोधनात्मक असते.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)