सद्ध्या आपल्या देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे कोरोना ही नक्की महामारी आहे का नाही तसेच त्यावर उपाय हुडकण्यात अर्थकारणाचा बोजवारा किती उडालेला आहे(अर्थात हा दैवी प्रकोप आहे असं दस्तुरखुद्द मंत्री बाईसाहेबांनी सांगितल्यामुळे बाकीच्यांनी कोणताही युक्तिवाद करण्यात अर्थ नाही असो) हे नसून सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हे आहे. खरंतर सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हता म्हंटल्यावर चावीवाल्याला बोलवल्यामुळे घोळ झाला त्याच वेळी सीआयडी ला एक फोन केला असता तर हे प्रकरण चिघळले नसते अन् मुंबई पोलीस ते सीबीआय व्हाया बिहार पोलीस असा त्याचा खेळ खंडोबा झाला नसता. आपल्या दयाभाऊने कोणतेही एक्सट्रा पैसे न घेता दरवाजा उघडला ( कदाचित तोडला ) असता अन् काही तासांच्या आतच सर्व प्रकरण निकाली निघाले असते पर्यायानं देशाचा व टिव्ही समोर तासनतास डोकं खाजवत खरंतर गांजवत बसणाऱ्यांचा वेळ सत्कारणी लागला असता. परंतू दररोज हजारो घडणारे गुन्हे व त्यासाठी लागणारी सक्षम तपास यंत्रणा आणि त्या पुढेही जावून सक्षम न्यायव्यवस्था ही सुशांतसिंग या व्यक्तीला मिळणाऱ्या न्याया इतकीच देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणाऱ्या न्यायासाठी जास्त महत्त्वाची आहे. घटनेला अपेक्षित व्यापक देशहीत पाहणारे व दूरदृष्टी असणारे राजकारणी, प्रामाणिक शासकीय कर्मचारी तसेच जागरूक पत्रकारिता अन् या सर्वांसाठी आग्रही नागरिक याची नितांत गरज आहे परंतू हे जग मनोरंजन, मनोरंजन अन् मनोरंजन या तीनच गोष्टींवर चालते हे डर्टी असले तरी स्वच्छ वास्तव विद्या बालनने सांगून ठेवलेले आहे. तेव्हा कल्पनेतच रमणाऱ्या व सुखावणाऱ्यांना अफुची गोळी देण्यातच तथाकथित सर्व क्षेत्रातील सत्ताधाऱ्यांचे हीत आहे. आपण मात्र दैवी कृपा केव्हां होते याची वाट पाहू तोपर्यंत सुsss शांतता.....
विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
सुsss शांतता...कोर्ट चालू आहे !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा