नुकतेच कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे (सर्किट बेंच) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही गोष्ट घडत असताना मला एका गोष्टीने प्रभावित केले ती म्हणजे त्यांच्या समोर सादर करण्यात आलेला पोवाडा
शाहीर विशारद डॉ.आझाद नायकवडी यांनी तो पोवाडा सादर केला खरंतर एखादी घटना अस्तित्वात येते तेंव्हा त्या पाठीमागे द्रष्टेपणाने कार्य केलेल्या थोर समाज सूधारकांचे योगदान ते सद्य स्थितीतील घडामोड याची मांडणी थोडक्यात अन् प्रभावीपणे विशद करण्याची ताकद काय असते तेच त्यांनी दाखवून दिले. अंगांगत रोमांच भरणे अन् भारावून जाणे काय असते हे आजच्या काळात देखील आपल्या पोवाडा संस्कृतीतून तेवढ्याच ताकदीने मांडता येते हेच प्रकर्षाने जाणवले अन् खरोखरच पोवाडा ऊर्जा, शहारा अन् प्रेरणादायी विचार यांचा जागर असतो हे अधोरेखित झाले.
शाहीराला अन् शाहिरी संस्कृतीला मानाचा मुजरा
