विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
गुरुवार, २४ जानेवारी, २०१९
सोमवार, २१ जानेवारी, २०१९
बुधवार, ९ जानेवारी, २०१९
गोठलेली सद्सद्विवेकबुद्धी अन् समतोल विचारांची ऊब...
आज एक बातमी वाचण्यात आली, कठैली, मुज्जफरानगर, उत्तरप्रदेश येथे एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शॉल घातली अन् त्याच्या पुढे शेकोटी पेटवून ठेवली याची स्थानीक यंत्रणांनी दखल घेत त्या व्यक्तीची चौकशी केली असता थंडी पासून संरक्षण करण्यासाठी आपण असे केले असल्याचा खुलासा त्याने केला.
सदरची व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा निष्कर्ष काढत त्याला सोडून देण्यात आले मग प्रश्न असा उरतो जर सदर व्यक्ती खरोखरच मनोरुग्ण असेल (कोणत्या वैद्यकीय चाचणी अथवा अधिकृत व्यक्ती नुसार ठरवले हे गुलदस्त्यातच आहे असो) तर त्याच्या योग्य मानसिक आरोग्यासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी न घेता यंत्रणा त्याला मोकाटच सोडणार असेल तर मग या यंत्रणेच्या आरोग्याच काय ती निरोगी आहे का केवळ कायदेशीर सोपस्कार पार पाडल्याबद्दल स्वतःचेच अभिनंदन करायचे. बर दुसरा मुद्दा असा या थंडीच्या लाटेचे कवतिक सोहळ्यात अनेक प्रार्थनास्थळात सदर मुर्तीला स्वेटर घालणारे व ती बातमी नवलाईने छापणारे मनोरुग्ण नव्हते का? का अशा गोष्टींना श्रद्धा अथवा भावनेचे कोंदण करीत बुद्धिभेद करायचा.
एकतर कोणत्याही विचारधारेचा पुतळा बनवणाऱ्या अन् त्याच्याच उंची नूसार बौद्धिक उंची तपासणाऱ्या आपल्या अलिकडील संस्कृतीत असे कित्येक मनोरुग्ण अभिमानाने मिरवताना तसेच त्यापुढे माना तुकविणारे कोणताही जाती, धर्म अथवा पक्ष असा भेदाभेद न करता मोठ्या प्रमाणात आढळतात. अशावेळेस यंत्रणा हातावर हात ठेवून असते अन्यथा हातात हात घालून वावरते.
विचारधारेपेक्षा कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नसते किंबहुना ती नसावी तरच समाज मन निरोगी अन् मानवतावादाला अनुकूल असेल अन्यथा विचारधारेची शेकोटी पेटवून कृत्रिम ऊब निर्माण करणाऱ्या सत्ताभिलाषी धेंडांना त्यावरच आपली पोळी भाजून घेण्यातच रस असेल.आपण मात्र समतोल विचारांच्या मशाली पेटवून अशा धेंडांना धडा शिकवायचा हाच निर्धार कोणत्याही परिस्थितीत सद्सद्विवेकबुद्धी गोठवून टाकणार नाही.
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८
शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८
झुठ बोलेss कौआ काटे......
झुठ बोलेss कौआ काटे......
"झुठ बोलेss कौआ काटे काले कौवेसे डरियो", असं एक जुनं गाण आहे परंतू खोट बोल पण रेटून बोल असं ब्रीदवाक्य असणाऱ्या सराईत डोम कावळ्यांना कसली आलीये भिती तेव्हा भिती वैगरे पापभिरू सामान्यांना.
खर लक्षात ठेवायला लागत नाही पण खोट लक्षात ठेवावे लागते अस म्हणतात पण आपल्याकडे एखादी खोटी गोष्ट वारंवार व अनेकांकडून बोलली गेली की ती आपोआप खरी होते कारण एरवी सत्यनारायण घालणारे देखिल तीच्या मुळापर्यंत जाऊन सत्यता तपासण्यासाठी अनुत्सुक असतात तसेच बोलणाऱ्यांचे गहू विकले जातात पण न बोलणाऱ्यांचे सोने देखिल विकले जात नाही ही म्हण पक्की ठाऊक असणारे बोल घेवडे हेच लोकप्रिय नेते म्हणून उदयास येतात नंतर भुकेला कोंडा अन् निजेला ला धोंडा असणाऱ्या वर्गाला बोलाची कढी अन् बोलाचाच भात खावा लागतो मग मुडदूस झाल्याप्रमाणे पोट फुगतं मात्र हातापायांच्या काड्या होतात.
जाऊ दे मला काय माझं व्यवस्थित चालयं ना मग कशाला लय डोक्याला ताण द्यायचा अन् काय फरक पडणारे अस म्हणणाऱ्या 'आहे रे' वर्गाला मात्र सेल्फीचं आकर्षण असतं परंतू या स्वमग्नतेकडे झुकलेल्या आत्मकेंद्री वृत्ती भोवताली जे वास्तवाच वलय असते त्याच जेंव्हा वावटळीत रुपांतर होत तेंव्हा मात्र तो खऱ्या अर्थाने एकाकी होतो. माणुस समाजप्रिय प्राणी आहे तेव्हा समाजात चाललेल्या चांगल्या वाईट घटनांचा कळत नकळत त्याच्यावर परिणाम होत असतोच अफवांचे बळी हे त्याचे ताजे उदाहरण एव्हाना संपूर्ण जगावरच याचा दुष्परिणाम जाणवू लागलाय म्हणुनच पहिल्या विश्व युद्धाच्या शताब्दी निमित्त कार्यक्रमात फ्रान्सच्या अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राॅन यांनी केलेले "राष्ट्रवाद हा राष्ट्रप्रेमाच्या अगदी विरोधी अन् विश्वशांतीस प्रतिकूल असतो" हे वक्तव्य फार महत्वाचे आहे.
सौ सुनार की एक लोहार की प्रमाणे शंभर खोट्यांना एक खरं पुरून उरू शकते गरज असते फक्त सद्सद्विवेकबुद्धी जागृत असण्याची. कोर्टात सूद्धा साक्षीदारांच्या वक्तव्याला महत्व असतं चित्रपटात पाहिल्याप्रमाणे धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथ घेणाऱ्याची नैतिकता कोर्टाने गृहीत धरलेली असते मात्र जिथे धर्माचाच राजकीय आखाडा झालाय तिथे नैतिकतेचा बाजार व्हायला कितीसा वेळ लागतो.काळा कोट घालून खऱ्याच खोटं अन् खोट्याच खरं करण्यातच व्यस्त असणारे त्याचेच द्योतक आहे.
दहा तोंडी रावण सुद्धा कधीही खोटं बोलल्याचा उल्लेख ऐकिवात नाही परंतू एकच खोटं दहा प्रकारे बोलणारे मात्र दिवसाढवळ्या ताठ मानेने फिरतात हे कलयुग आहे इथे सत्यवचनी पुरुषोत्तमाचे रामराज्य अवतरणे दुरापास्तच. परंतू खऱ्या ची दुनिया नाही असा हताश डॉयलॉग मारण्यापेक्षा "सत्य मेव जयते" हाच विश्वास अन् हीच अपेक्षा ठेवत संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिलीये नाही बहुमत" एवढे तरी आपण नक्कीच करु शकतो.
संदिप महामुनी.

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८
पुलोत्सव....!
पुलोत्सव...!
वस्तू,व्यक्ती,समाज,भूभाग वैगरे याचे विविधांगी निरीक्षण अन् त्याचं खुमासदार नर्म विनोदी परिक्षण करणाऱ्या अलौकिक दृष्टीने भारावून टाकणारे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. वृत्ती.
खटकणाऱ्या गुणधर्मा सहित वेगळेपण विनोदबुद्धीने स्विकारण्याची कला म्हणजे पु ल प्रवृती.
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात निराशेच्या ,असमाधानाच्या क्षणांनी वैतागलेल्या भावनांना हमखास सुसह्य करणारी गुरुकिल्ली असणे म्हणजे पु ल संस्कृती.
अश्या वल्ली व्यक्ति चे स्मरण म्हणजे हास्याची कारंजी,विनोदाची फुलबाजी अन् आनंदाची दिवाळी गरज असते फक्त आपण आनंदयात्री होण्याची....

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८
LIFE ...
Life
What's it..? we always want to know, we are just thinking, we even don't know from where we start thinking it's all about journey to evolve oneself physically and emotionally. Every day comes with something new, something different. Day by day we are moving towards so called maturity but we are matured abt our past experiences only with respect to unique environment of physic & emotions which we aware of but never prepared for the unexpected,sometimes unwanted incidents. As maturity has no age bar as we grow we try to control our emotions publicly that's we learns from & its action depend upon own guess works abt how others ll think or reacts.
Person with whom we live automatically engulfed with their smells either knowingly/ unknowingly we follow them or we try to change them according to our habits but we forget that instead of point out someone's naturalistic way to change, exchange our point of views is better.
In present we always has sense to correct our past and cautious abt future but there is no use. If you become unhappy due to past life & fear abt future then you are wasting your precious happy and fearless present. As per my opinion we never ever perfect to every situation as all do's and don't are ideological so need to be normal to react & accept the surprises that's LIFE.

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८
कलम ३७७ उपेक्षित समानतेचा जागर....
नुकताच न्यायालयाने अनैसर्गिक शारीरिक संबंधीचे गुन्हेगारी कलम ३७७ रद्द केले त्यामुळे समलैंगिक संबंध हा कायदेशीर गुन्हा राहणार नाही.एका अर्थाने न्यायपालिकेचे अभिनंदनच केले पाहिजे कारण बहुमत पद्धती स्विकारलेल्या आपल्या देशात व्यक्तिगत हक्काचे महत्व अधोरेखित केले आहे अन् ते मान्य करताना " I am what I am, so take me as I am." या जर्मन तत्ववेत्त्याच्या विधानाचा आधार घेतला आहे.
या निकालाचा LGBTQIA+ संबंधित लोकांना आनंद होणे स्वाभाविक आहे परंतू ह्या आनंदाचा अतिरेकी बाजार अथवा उन्मादी उदात्तीकरण करायची काही एक गरज नाही कारण या निकालाचा अर्थ तुमच्या वैयक्तिक आवडी-निवडी खाजगी पातळीवर स्विकार्हाय असतील परंतू कुणाही तिसऱ्याला अथवा समाजाला हानीकारक असता कामा नये हा सर्व सामान्यांना असणारा नियम त्यांना सुद्धा लागू आहे.
वास्तविक मानवी व्यवहाराचे प्रकृती, विकृती अन् संस्कृती या तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे.जे नैसर्गिक ते प्राकृतिक पण काही न समजू शकणाऱ्या कारणांमुळे नैसर्गिक गोष्टीतही बदल घडतो ती इतरांच्या तुलनेत विकृती असू शकते परंतू त्याच्या दृष्टीने ते नैसर्गिकच असते परंतू व्यक्तिगत आवड_निवड जोपासताना इतर बाबींवर प्रतिकूल परिणाम होणार नाही यासंबंधी जागरूक राहून स्वतः सार्वजनिक साधनसुचिता पाळणे ही असते संस्कृती याचा विचारीजणांना विसर पडता कामा नये.
बहुमत असणाऱ्यांनी इतरांचे वेगळेपण मान्य करत असताना इतरांनी समलैंगिकतेतून नैसर्गिक प्रजोत्पादन होऊ शकत नाही तो केवळ चार भिंतींच्या आतील वैयक्तिक आनंद अथवा समाधानाचा भाग आहे हे स्विकारले पाहिजे.त्या गोष्टीचे उदात्तीकरण न करता आपापल्ये
सर्वसामान्यपण जपले पाहिजे.
न्यायालयाने प्रत्येक व्यक्तिगत हक्काची दखल घेत केलेला निर्णय हा उपेक्षित समानतेच्या भल्यासाठी घेतला आहे त्याचा योग्य प्रकारे जागर झाला पाहिजे.
गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८
प्रतिज्ञेचे पाईक.....!
प्रतिज्ञेचे पाईक.....!
शाळेतील कळत्या वयापासून पुस्तक पाहत आलोय अन् परिक्षेतील गुणांसाठी व प्रगती-पुस्तकातील शेऱ्यासाठी पहिली तीन पाने सोडून त्यातील पहिला धडा सुरू होतो हेच शिकवलं होतं पण पहिल्या तीन पानापैकी एकावरील राष्ट्रगीत अन् दुसऱ्या वर प्रतिज्ञा बद्दल जगाच्या शाळेत उपयुक्त शैक्षणिक संस्कार काय झाले नाहीत केवळ शाळा सुरू होताना रोजच्या घोकंपट्टीचे सोपस्कार मात्र चालूच राहिले.भारतातील प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने भारतीय बनवणाऱ्या प्रतिज्ञेचे महत्व केवळ पुस्तकी उपक्रम उरल्याने अनेकांच्या मनात खालील प्रतिज्ञाच घोळत राहतीय
भारत माझा अन् फक्त माझाच देश आहे।
सारे स्वधर्मीय माझे बांधव आहेत।
माझ्या जातीवर माझे प्रेम आहे।
माझ्या घरातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फायद्याच्या माणसांचा मान ठेवीन
आणि त्यांच्याशीच सौजन्य दाखवेन ।
माझाच देश आणि माझेच बांधव
यांचीच पाठराखण करण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
ही विचारसरणी आपल्याच देशात नव्हे तर जगात फोफावत चाललीय अन् ती धोकादायक बाब आहे यासाठीच देशाची प्रतिज्ञा केवळ पुस्तकात छापण्या पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली पाहिजे तरच भावी काळ विविधतेतून एकतेचा असेल.
जय हिंद !
रविवार, २६ ऑगस्ट, २०१८
अद्वैताचा साक्षात्कार
परमेश्वर ही संकल्पना आस्तिकतेशीच निगडित असते हा नास्तिकतेचा समज असू शकतो परंतू निरपेक्ष प्रेम भावनेने अद्वैताचा साक्षात्कार होऊन भक्तिरसात न्हाऊन निघणे ही नैसर्गिक आत्मिक ओढीची आस असू शकते अन् ती सकल जनांना सारखीच असते भले ते नातं दृष्य-अदृष्य स्वरुपाचे असो...
विठ्ठल भक्तांसाठी विठ्ठल म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अजय गोगावले यांच्या लेखणीतून अन् अजयअतुल यांच्या संगीतमय अश्या माऊली माऊली या गाण्यातून मिळाले नाही अन् ते अर्थपूर्ण ऐकताना भक्तांची आर्त साद काळजाला भिडली नाही तरच नवल.....
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८
मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८
सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८
Unequal pillars of social democracy
Unequal pillars of social democracy
Today's world is world of information which makes everybody equipped with awareness about many things at the same time & each age group equally due to easy availability of tools to access it. Instead of individuals requirements rather it is agenda of service providers ( TRP driven media ) which acquire their thinking processes & channelised its patterns which converts referendum towards their end.
As having information doesn't mean knowledgeable one, because sorting & analysing of information with your conscience is important. The logic behind the way you think is your subconscious mind developed in relative circumstances i.e. your upbringing which matters a lot but never be a slave to logic rather answer for it.
Due to lack of harmony, people's views towards nationalism is like wave circles, they're mixed interpretation of own ideology about caste, religion, statehood, politics (as political parties commonly had no fix ideology rather than elective measures ) etc. And these people are from every sector of govt /non govt machinery & their remarks departure from accepted practice which promotes cultural nationalism & had wider ramifications with damaging letter & spirit of constitutional arrangements which extremely unacceptable.
As legislature,executive,judiciary and media are considered four pillars of democracy now IV-B is social media which is an additional backing or support pillar which affect other pillars in terms of level of thinking which effects their equality in terms of ethics. These inequalities of pillars harmful to structure of so called democracy & constitutional functionaries.
On the eve of the independence day this freedom of information & expression needs filter of neutrality.
Their is difference between my India & only my India. Citizen engagement by pick flaws & ill acts fuelling by rumours or stigmatised entire society for someone guilty belong to the same section as right & left extremists both are obsessive dashed off opine & front for shape the country on their terms & conditions. As their is rough road to travel instead of being victims of the black propaganda we have to change information driven country to ethical knowledge driven country to support democratic structure equally balanced. Patriotic brings responsibility & nationalist makes blind egos so be a part of the India & be an Indian.
Sandeep Mahamuni.

बुधवार, १८ जुलै, २०१८
Charlie Chaplin
To show the way how to overcome poverty, sorrow & discomfort in terms of humour to humanity King of tragedy turned oneself to the King of comedy thy name is Charlie Chaplin who says humour is sense of survival & preserve our sanity. We think too much & feel too little, more than machinery we need humanity, more than cleverness we need kindness, gentleness without those qualities life will be violent & all ll be lost.
Humour & humanity r binding elements although man's humanity to man is greater than his inhumanity.
गुरुवार, १२ जुलै, २०१८
#MISSIONIMPOSSIBLE
Elite foreign divers & Thai Navy SEALS lead by Narongsak Osatanakorn successfully rescued 12 Thai boys of Wild boars soccer team & their coach Ekkapol Ake Chantawong who is former Buddhist monk.
They entered into the Thai cave "Tham Luang" situated in Northern Thailand on 23rd Jun & trapped several km inside it till 10th July. Rescue operators entered thru twisting narrow & jagged passageways that in some places are completely flooded like cafe latte water. After a short deluge of rain with more bad weather forecast, authorities had to act immediately. The extremely dangerous operation to extract all of them on its final day which is named as D-Day.
Pheerapate nickname 'Night' who celebrated 16th birthday with their team members in the cave reflects positive approach towards tough situation.
Hat's off to all the rescue team members including the deceased martyr Saman Gunam for their extraordinary deeds.

सोमवार, ९ जुलै, २०१८
मानसिक गुलामगिरीची नांदी....!
आजच्या दिवसातल्या दोन बातम्या भविष्यातील गंभीर धोक्याची घंटा आहेत यात माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
पहिली बातमी म्हणजे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यात माऊलींच्या पायावर डोकं ठेवण्याचा कार्यक्रम उरकल्या नंतर भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना केलेले मार्गदर्शन. त्यावेळी त्यांनी तुम्हाला तुमचा (प्रत्यक्षात यांचाच ) हेतू साध्य करायचा असेल तर तुमच्या पोस्ट , मॅसेजेस या टोकदार असल्या पाहिजेत असा शहाजोग सल्ला दिला तसेच येणाऱ्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सायबर योद्धा होण्याचा मंत्र देखिल दिला आहे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार येणारा काळ सायबर युद्धाचा आहे. वरवर यात तथ्य असले तरी जो बागुलबुवा निर्माण करून अनिष्ट प्रथेला खतपाणी घालण्याचाच जो प्रकार घडत आहे त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत . कारण आधीच सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीला आपल्याला हवे तसे वापरण्यासाठी तथाकथित तज्ञांच्या फौजा तयार करण्याचा घाट उघडपणे घातला जातोय. अन् अशा फौजांच्या सेनापतीचे मनसुबे राष्ट्रहितापेक्षाही स्वहिताचेच अधिक आहेत हे ही न समजण्या इतके तांत्रिक प्रगत मानवी रोबॉट लढण्यासाठी सज्ज होतायत अन् याला (सत्ता अभिलाषी) मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नेहमीप्रमाणे मम् म्हणतात हा येणारा काळ कीती धोकादायक आहे हेच सुचित करतो. यांच्या उत्तराला तशाच प्रत्युत्तराने सामना करण्यासाठी इतर पक्ष देखिल आपसूकच या आभासी युद्धात ओढले जाणार शेवटी काय स्वतः विचार न करणाऱ्यांचे मेंदू काबीज करणारे मास्टर माइंड आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांच्या मतावरच विजय मिळवित जनाधाराच्या गप्पा मारत लोकशाही चिरायु होवोच्या घोषणा देणार. यात 3 जी बी डाटा रोज उपलब्ध करणाऱ्यांची नुसती बोटंच नाहीतर आख्खी मुठच तुपात असणार अन् आपण या मुठीत घुसमटत असू हे वेगळे सांगायला नको.
आता दुसरी बातमी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील. याठिकाणी आय पी एस प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात येते. नुकताच येथील प्रशिक्षणार्थीचा निकाल लागला एकुण १२२ पैकी ११९ जण अनुत्तीर्ण सोप्या भाषेत नापास झालेत. तरी देखील ही मंडळी प्रोबेशनवर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. हे म्हणजे लाल शेरा मारून देखिल वरच्या वर्गात ढकलण्यात आल्या सारखे झाले. नापास होणे इतपर्यंत ठिक पण त्यांचा प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग असणे म्हणजे गुणवत्तेशी तडजोड होय मग अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून (भविष्यात येथे लातूर पॅटर्नचे गँगस्टर दिसू नये म्हणजे मिळवली ) निघणारे तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांचे भरघोस पीक जर सत्वहिन असेल तर शासन ज्यांच्यासाठी कार्यरत असते त्यांचे खरचं भले होणार आहे का अन् मग हीच मंडळी सामाजिक धोक्यांना पुरून उरणारेत का केवळ पदाचा टेंभा मिरवणारेत.
एकीकडे अति महत्त्वाकांक्षी सत्ताधारी अन् दुसरीकडे कृत्रिम गुणवत्तेवर आधारित प्रशासकीय यंत्रणा यांचा समतोल राखला जाणार का त्यांची अभद्र युती होणार यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. एकीकडे अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल माध्यमांना सक्ती करणारे सरकार तशाच माध्यमाचा गैरवापर करत निरंकुश सत्ता मिळवणार असेल अन् त्यासाठी नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम नसेल तर पुढचा अशाप्रकारच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा काळ हा मानसिक गुलामगिरीची नांदीच ठरणार आहे.
संदिप महामुनी.
sandeepmahamuni.blogspot.in
सोमवार, २ जुलै, २०१८
अगतिकतेच्या टोकावर.....!
रविवार सकाळ दिल्लीतील ११ जणांच्या सामुहिक आत्महत्या तसेच संध्याकाळ धुळ्यातील राईनपाडा येथील ५ जणांच्या सामुहिक हत्यांनी अस्वस्थ करून गेली.
माणसातील या दोन विरुद्ध टोकाच्या भूमिका जीवन किती अनाकलनीय अन् अस्थीर झालय याचीच जाणीव अधोरेखित करतय.प्राथमिक तपासात सामुहिक आत्महत्या हे मोक्षप्राप्तीच्या विचाराधीन केलेले कृत्य असल्याचे समोर आले आहे.त्यावर त्यांच्या नातेवाईकांनी ते सर्व शिकलेले आहेत त्यामुळे अस काही करणार नाहीत अस म्हंटल आहे पण उच्च शैक्षणिक पदव्या घेणे अन् अंधश्रद्धाळू नसणे याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो तर त्याची जडणघडण कोणत्या विचारसरणीत होते यावर ते अवलंबून असते. वरुन कितीही शांत दिसणाऱ्या जीवनाच्या अंतरंगात किती अविचारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे हे अशा काही तरी अनपेक्षित कृतीनेच समोर येते परंतू लोक त्याकडे केवळ औत्सुक्याच्या परिप्रेक्ष्यातून पाहत असतील तर काही दिवस ही बातमी चर्चेत राहते अन् कालनियमाप्रमाणे विरुन देखिल जाते.
दुसरीकडे एखादा वॉट्स अप वरील मॅसेजचा स्वैर अर्थ काढत स्वतःच्या कल्पकतेने एखाद्याच्या बाह्य व्यक्तिमत्वावर व पेहराववर आधारित ( स्वच्छ शुभ्र पेहरावातले गुन्हेगार मात्र यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात ही खरी शोकांतिका आहे..! ) एखाद्या व्यक्ती चा संशय येणे इथपर्यंत ठीक आहे पण त्या व्यक्तीला थेट गुन्हेगार ठरवून त्याला स्वतःच शासन करणे अगदी कायदा व्यवस्थेला /पोलिसांना न जुमानता वेळ प्रसंगी त्यांच्यावर देखिल हल्ला करणाऱ्या सामुहिक मानसिकतेचा शोध घेणे आवश्यक आहे अन्यथा सुदृढ समाज मनाला नख लागणार यात शंका नाही. समुहाला स्वतःचा चेहरा नसतो अन् विचार ही नसतो असतो केवळ बेभानपणा. परंतू भानावर आल्यावर मात्र आपण निर्दोष लोकांचा बळी घेतला हे ध्यानात आल्यावर कुणाच्या पायावर डोकं ठेवून पापक्षालन करणारेत अन् त्यामुळे ज्यांच्या कुटुंबाचा आधारच गेलाय त्यांच्या दुःखाच काय त्यांना न्याय मिळणार आहे का अन् केव्हा अन् दोन-तीन हजारांच्या समुहातील पाच-दहा लोकांना(कोणता फार्म्युला वापरतात कुणास ठाऊक..! ) शिक्षा होऊन प्रश्न सुटणारे का? का त्यांच्या कुटुंबीयांची झालेली अपरिमित हानी भरुन येणार आहे.
वरील दोन्ही घटना माणूस केवळ माहिती ने भरलेला व भारलेला आहे इतकंच पण तो ज्ञानाने समृद्ध व जाणिवेने प्रगल्भ झालेला नाही हेच दर्शवते. हा पोकळ मानवी उत्क्रांत वाद विनाशाकडेच चालला आहे भले कुणी माकडापासून आपली निर्मिती झाली नाही म्हणो परंतू लोकंच ते आपल्या वर्तनाने खरं ठरवण्यासाठी अगतिक झाले आहेत अन् त्याच त्यांनी टोक गाठलय हेच सत्य विचारचक्र व्यापून टाकतय...
संदिप महामुनी.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)