चकाचक आयुष्यात कचाकच भरलेला सेक्स अन् पचापच थुकाव तस शिव्यांनी बरबटलेले बोलणे म्हणजे आजकालच्या पिढीची कलात्मक स्वातंत्र्य अन् सो कॉल्ड स्पेस ची वास्तववादी कल्पना. या मार्गाने जाणारी प्रत्येक गोष्ट आपलीशी मानने, हक्काची समजणे अन् तेच खरं बेफिकीर जगणं वाटणे हे ठराविक वयाच्या बेभान उसळत्या रक्ताचा जागतिक तोंडावळा असतो अन् थोड्याफार फरकाने सर्वांना तो लागू असतो. फरक आहे तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समाज माध्यमाच्या सुकाळाचा. आज वास्तव अन् अभासी यातील पुसटशी रेषा या माध्यमांनी केव्हाच पुसून टाकली आहे. आपल्याच प्रतिध्वनींच्या कोषातून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यातून निर्माण झालेल्या एकाकी बुद्धिमत्तेचा निष्कर्ष त्यांना एकीकडे एकलकोंडे तर दुसरीकडे दुभंगलेल्या मानसिकतेचे बनवत आहे. अशांना मग आयुष्य जगताना थिल्लरतेचेच आकर्षण व थिल्लरतेचाच आदर्श वाटतो. मग त्यांना शिस्त अन् सुसंस्काराच्या गोष्टी नेभळटपणाची लक्षण वाटतात. तेव्हा प्रचार नावाची यंत्रणा व राजनीतिक धोरण तज्ञ अशांना गृहीत धरून स्वतःच्या हातचे बाहुले बनवत स्वतःचीच विषयपत्रिका (अजेंडा ) राबवतात. मग दुधारी शस्त्रा प्रमाणे अशा तरुणांची संख्या राष्ट्राची ताकद न राहता ती राष्ट्रीय समस्या बनते. मनोरंजनातून झालेला प्रवास नकळत मनोरुग्णतेत परावर्तित होत जातो. ही क्रयशक्ती योग्य मार्गाने हाताळणे हे शासन म्हणून राज्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्याऐवजी त्यांना भुलथापा देऊन सत्तेसाठी चुचकारण्यावर भर देणारे व त्यासाठी आगतिक झालेले लोकनेते होण्यातच धन्यता मानणारे कसला देश घडवणारेत त्यांनाच ठाऊक. तरूणांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सबलीकरण हाच खरा विकासाचा पाया आहे अन् त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा तारूण्याच वारं वाहू द्यायचे का तारूण्याचा वारू दौडावयाचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.
विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
शुक्रवार, २९ मार्च, २०१९
तारुण्याच वारं की तारुण्याचा वारू...
चकाचक आयुष्यात कचाकच भरलेला सेक्स अन् पचापच थुकाव तस शिव्यांनी बरबटलेले बोलणे म्हणजे आजकालच्या पिढीची कलात्मक स्वातंत्र्य अन् सो कॉल्ड स्पेस ची वास्तववादी कल्पना. या मार्गाने जाणारी प्रत्येक गोष्ट आपलीशी मानने, हक्काची समजणे अन् तेच खरं बेफिकीर जगणं वाटणे हे ठराविक वयाच्या बेभान उसळत्या रक्ताचा जागतिक तोंडावळा असतो अन् थोड्याफार फरकाने सर्वांना तो लागू असतो. फरक आहे तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समाज माध्यमाच्या सुकाळाचा. आज वास्तव अन् अभासी यातील पुसटशी रेषा या माध्यमांनी केव्हाच पुसून टाकली आहे. आपल्याच प्रतिध्वनींच्या कोषातून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यातून निर्माण झालेल्या एकाकी बुद्धिमत्तेचा निष्कर्ष त्यांना एकीकडे एकलकोंडे तर दुसरीकडे दुभंगलेल्या मानसिकतेचे बनवत आहे. अशांना मग आयुष्य जगताना थिल्लरतेचेच आकर्षण व थिल्लरतेचाच आदर्श वाटतो. मग त्यांना शिस्त अन् सुसंस्काराच्या गोष्टी नेभळटपणाची लक्षण वाटतात. तेव्हा प्रचार नावाची यंत्रणा व राजनीतिक धोरण तज्ञ अशांना गृहीत धरून स्वतःच्या हातचे बाहुले बनवत स्वतःचीच विषयपत्रिका (अजेंडा ) राबवतात. मग दुधारी शस्त्रा प्रमाणे अशा तरुणांची संख्या राष्ट्राची ताकद न राहता ती राष्ट्रीय समस्या बनते. मनोरंजनातून झालेला प्रवास नकळत मनोरुग्णतेत परावर्तित होत जातो. ही क्रयशक्ती योग्य मार्गाने हाताळणे हे शासन म्हणून राज्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्याऐवजी त्यांना भुलथापा देऊन सत्तेसाठी चुचकारण्यावर भर देणारे व त्यासाठी आगतिक झालेले लोकनेते होण्यातच धन्यता मानणारे कसला देश घडवणारेत त्यांनाच ठाऊक. तरूणांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सबलीकरण हाच खरा विकासाचा पाया आहे अन् त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा तारूण्याच वारं वाहू द्यायचे का तारूण्याचा वारू दौडावयाचा हे त्यांनीच ठरवायचे आहे.
शुक्रवार, १५ मार्च, २०१९
नैतिकतेचे गोडवे अन् सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्रा...

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. काही ढोबळ निकषांनुसार हे सत्य असले तरी खरोखरीच तसेच असेल व त्याचा देशातील शेवटच्या घटका पर्यंत लाभ होत असेल याची खात्री देता येत नाही.आतमधे पोकळ, किडलेल्या व्यवस्थेला वरवरची मलमपट्टी करण्यात धन्यता मानणारे व सगळे आलबेल आहे असे भासवणारेच अधिक.
सध्या या लोकशाहीचा उत्सव निवडणूकीच्या माध्यमातून साजरा होणार आहे अस अलंकारिक भाषेत तथाकथित बुद्धिजीवी म्हणत असले तरी सामान्यपणे लोकशाहीचा अर्थ अन् निवडणूकीच्या माध्यमातून अपेक्षित मतितार्थ खरच कळत असेल असे मला वाटत नाही.स्वार्थाचा झेंडा घेणारे व देणारे उन्मादी उत्साहित लोकशाहीचा खरा उत्सव साजरा करण्यापेक्षा एक सोपस्कार एवढ्याच मानसिकतेतून पाहत असतात.
सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी तर विरोधी पक्ष सत्ता मिळवण्यासाठी आतूर असतात मग त्यासाठी साठमारी ते हाणामारी अन् फोडाफोडी ते तडजोडी सर्व पर्याय खुले असतात कारण सर्वसामान्य जनतेला तिच्याच कर्मदरिद्र्यामुळे गृहीत धरलेले असते. नुकत्याच एका जेष्ठ अशा जाणत्या राजाने मी माझ्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकतो परंतू दुसर्याच्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकत नाही असे वक्तव्य केले तसेच दुसर्या मर्द मराठी सेनाप्रमुखाने आम्ही स्वतःच्या मुलाबरोबर दुसर्यांचेही लाड पुरवतो असे सांगितले यावर तिथे हशा अन् टाळ्या झडल्या अन् ते बघणाऱ्याला व ऐकणाऱ्यांना त्यांच्या हजरजबाबी वक्तृत्व कलेचे कोण कौतुक वाटले.एवढीच आपली प्रगल्भ भुमिका.परंतू प्रगल्भ लोकशाहीसाठी असणारी निवडणूक प्रक्रिया ही काय बायका-मुलांचे हट्ट अन् लाड पुरवायला आंदण दिले की काय? असा प्रश्न मतदाराला किंवा पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्याला पडत नाही हीच लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यां पासून मतदारां पर्यंत सर्वांना गाजर दाखवत खिशात ठेवण्याची किमया त्यांना चांगलीच अवगत आहे.मग असले लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे राजकारणी जन सेवक नसून वरकरणी चुचकारणारे सत्ता सेवकच असतात.
उघड उघड स्वार्थकारण करणारे पैशाच्या व संस्थेच्या मक्तेदारीमुळे तसेच लाचार व तुमच्या साठी कायपण म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे फुरफुरत असतात अनैतिकतेचे पाढे गिरवणारेच तथाकथित नैतिकतेचे गोडवे गात असतात.खरी लोकशाही अंगी बाणवायला मात्र सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्राच घ्यावी लागते.

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९
अब तुम्हारे हवाले वतन साथियों....
अब तुम्हारे हवाले वतन साथियों....
देश म्हणजे केवळ डोंगर-पर्वत किंवा नदी-समुद्र यानी वेढलेला भुप्रदेश नव्हे तर त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा समुह म्हणजे देश.या देशाचे पर्यायाने इथे राहणाऱ्या लोकांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी स्वखुशीने खडतर मार्ग निवडत वेळप्रसंगी स्वतःच्या ईच्छा आकांक्षांना दुर्लक्षित करत स्वसुखाचा त्याग करून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता -50°C असो की 50°C सदैव खडा पहारा देत सीमेवर तैनात राहणारा सैनिक म्हणजे इथे राहणाऱ्या तमाम लोकांच्या सुरक्षित भावनेचा आधारस्तंभच होय. सुरक्षित भावना ज्यामुळे आपण आपापली दिनचर्या बिनदिक्कत चालू ठेवू शकतो. ज्या मध्ये माझ्या मते नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे विशेष काही बदल झाला नसावा कारण अजून देखिल सीमेवर तैनात असलेला तो जवान डोळ्यात तेल घालून बाह्य शत्रूवर लक्ष ठेवून आहे.काळजीत असतील ती त्यांची कुटुंबे बाकी आपापल्या कुटुंबकबिल्यासोबत सेल्फीमग्न असतील. निषेधाचे इती कर्तव्य पार पाडून देशाच्या एकता व अखंडता यासाठी आवश्यक गोष्टी न करता सोयीस्कर साचेबद्ध एकांगी विचारसरणी शेअर करण्यात मश्गुल सोशल मीडियालिस्ट पुन्हा पाट्या टाकण्यात धन्यता मानतील.मग बलिदान का व कुणासाठी वर वर देशप्रेमाची उकळी फुटणारे किंवा आम्ही सुद्धा सोबत आहोत अशी उबळ येणारे यांच्यासाठी,

का या देशात राहून धर्माधारित शत्रू राष्ट्राचे गोडवे गाणारे यांच्यासाठी, हाच प्रश्न प्राणाची आहुती देताना मनात येत नसेल, देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जवानाच्या या भावना नसतील.मग सहा फुटाचा देह जेंव्हा पावशर मांसाच्या तूकड्यात तिरंग्यात लपेटून घरी येतो तेव्हा त्यापेक्षा अधिक बोथट विचारसरणीची गर्दी पाहून त्याच्या आत्म्याला काय यातना होत असेल. माणसांपासून बनलेला समाज अन् समाजसमुहापासून बनलेला देश वैचारिक दृष्ट्या सुसंस्कृत अन् सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकालाच पार पाडायची आहे. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिक व व्यापक हितासाठी योगदान दिले पाहिजे याच देशसेवेची अपेक्षा मनी बाळगत, अब तुम्हारे हवाले वतन साथियों म्हणत स्वतःचे प्राण अर्पण करत तो आपले कर्तव्य पार पाडतोय गरज आहे ती आपण आपले कर्तव्य पार पाडण्याची.....
जय हिंद...!

गुरुवार, २४ जानेवारी, २०१९
सोमवार, २१ जानेवारी, २०१९
बुधवार, ९ जानेवारी, २०१९
गोठलेली सद्सद्विवेकबुद्धी अन् समतोल विचारांची ऊब...
आज एक बातमी वाचण्यात आली, कठैली, मुज्जफरानगर, उत्तरप्रदेश येथे एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शॉल घातली अन् त्याच्या पुढे शेकोटी पेटवून ठेवली याची स्थानीक यंत्रणांनी दखल घेत त्या व्यक्तीची चौकशी केली असता थंडी पासून संरक्षण करण्यासाठी आपण असे केले असल्याचा खुलासा त्याने केला.
सदरची व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा निष्कर्ष काढत त्याला सोडून देण्यात आले मग प्रश्न असा उरतो जर सदर व्यक्ती खरोखरच मनोरुग्ण असेल (कोणत्या वैद्यकीय चाचणी अथवा अधिकृत व्यक्ती नुसार ठरवले हे गुलदस्त्यातच आहे असो) तर त्याच्या योग्य मानसिक आरोग्यासाठीच्या उपाययोजनांची जबाबदारी न घेता यंत्रणा त्याला मोकाटच सोडणार असेल तर मग या यंत्रणेच्या आरोग्याच काय ती निरोगी आहे का केवळ कायदेशीर सोपस्कार पार पाडल्याबद्दल स्वतःचेच अभिनंदन करायचे. बर दुसरा मुद्दा असा या थंडीच्या लाटेचे कवतिक सोहळ्यात अनेक प्रार्थनास्थळात सदर मुर्तीला स्वेटर घालणारे व ती बातमी नवलाईने छापणारे मनोरुग्ण नव्हते का? का अशा गोष्टींना श्रद्धा अथवा भावनेचे कोंदण करीत बुद्धिभेद करायचा.
एकतर कोणत्याही विचारधारेचा पुतळा बनवणाऱ्या अन् त्याच्याच उंची नूसार बौद्धिक उंची तपासणाऱ्या आपल्या अलिकडील संस्कृतीत असे कित्येक मनोरुग्ण अभिमानाने मिरवताना तसेच त्यापुढे माना तुकविणारे कोणताही जाती, धर्म अथवा पक्ष असा भेदाभेद न करता मोठ्या प्रमाणात आढळतात. अशावेळेस यंत्रणा हातावर हात ठेवून असते अन्यथा हातात हात घालून वावरते.
विचारधारेपेक्षा कोणतीही व्यक्ती श्रेष्ठ नसते किंबहुना ती नसावी तरच समाज मन निरोगी अन् मानवतावादाला अनुकूल असेल अन्यथा विचारधारेची शेकोटी पेटवून कृत्रिम ऊब निर्माण करणाऱ्या सत्ताभिलाषी धेंडांना त्यावरच आपली पोळी भाजून घेण्यातच रस असेल.आपण मात्र समतोल विचारांच्या मशाली पेटवून अशा धेंडांना धडा शिकवायचा हाच निर्धार कोणत्याही परिस्थितीत सद्सद्विवेकबुद्धी गोठवून टाकणार नाही.
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८
शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८
झुठ बोलेss कौआ काटे......
झुठ बोलेss कौआ काटे......
"झुठ बोलेss कौआ काटे काले कौवेसे डरियो", असं एक जुनं गाण आहे परंतू खोट बोल पण रेटून बोल असं ब्रीदवाक्य असणाऱ्या सराईत डोम कावळ्यांना कसली आलीये भिती तेव्हा भिती वैगरे पापभिरू सामान्यांना.
खर लक्षात ठेवायला लागत नाही पण खोट लक्षात ठेवावे लागते अस म्हणतात पण आपल्याकडे एखादी खोटी गोष्ट वारंवार व अनेकांकडून बोलली गेली की ती आपोआप खरी होते कारण एरवी सत्यनारायण घालणारे देखिल तीच्या मुळापर्यंत जाऊन सत्यता तपासण्यासाठी अनुत्सुक असतात तसेच बोलणाऱ्यांचे गहू विकले जातात पण न बोलणाऱ्यांचे सोने देखिल विकले जात नाही ही म्हण पक्की ठाऊक असणारे बोल घेवडे हेच लोकप्रिय नेते म्हणून उदयास येतात नंतर भुकेला कोंडा अन् निजेला ला धोंडा असणाऱ्या वर्गाला बोलाची कढी अन् बोलाचाच भात खावा लागतो मग मुडदूस झाल्याप्रमाणे पोट फुगतं मात्र हातापायांच्या काड्या होतात.
जाऊ दे मला काय माझं व्यवस्थित चालयं ना मग कशाला लय डोक्याला ताण द्यायचा अन् काय फरक पडणारे अस म्हणणाऱ्या 'आहे रे' वर्गाला मात्र सेल्फीचं आकर्षण असतं परंतू या स्वमग्नतेकडे झुकलेल्या आत्मकेंद्री वृत्ती भोवताली जे वास्तवाच वलय असते त्याच जेंव्हा वावटळीत रुपांतर होत तेंव्हा मात्र तो खऱ्या अर्थाने एकाकी होतो. माणुस समाजप्रिय प्राणी आहे तेव्हा समाजात चाललेल्या चांगल्या वाईट घटनांचा कळत नकळत त्याच्यावर परिणाम होत असतोच अफवांचे बळी हे त्याचे ताजे उदाहरण एव्हाना संपूर्ण जगावरच याचा दुष्परिणाम जाणवू लागलाय म्हणुनच पहिल्या विश्व युद्धाच्या शताब्दी निमित्त कार्यक्रमात फ्रान्सच्या अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राॅन यांनी केलेले "राष्ट्रवाद हा राष्ट्रप्रेमाच्या अगदी विरोधी अन् विश्वशांतीस प्रतिकूल असतो" हे वक्तव्य फार महत्वाचे आहे.
सौ सुनार की एक लोहार की प्रमाणे शंभर खोट्यांना एक खरं पुरून उरू शकते गरज असते फक्त सद्सद्विवेकबुद्धी जागृत असण्याची. कोर्टात सूद्धा साक्षीदारांच्या वक्तव्याला महत्व असतं चित्रपटात पाहिल्याप्रमाणे धार्मिक पुस्तकावर हात ठेवून शपथ घेणाऱ्याची नैतिकता कोर्टाने गृहीत धरलेली असते मात्र जिथे धर्माचाच राजकीय आखाडा झालाय तिथे नैतिकतेचा बाजार व्हायला कितीसा वेळ लागतो.काळा कोट घालून खऱ्याच खोटं अन् खोट्याच खरं करण्यातच व्यस्त असणारे त्याचेच द्योतक आहे.
दहा तोंडी रावण सुद्धा कधीही खोटं बोलल्याचा उल्लेख ऐकिवात नाही परंतू एकच खोटं दहा प्रकारे बोलणारे मात्र दिवसाढवळ्या ताठ मानेने फिरतात हे कलयुग आहे इथे सत्यवचनी पुरुषोत्तमाचे रामराज्य अवतरणे दुरापास्तच. परंतू खऱ्या ची दुनिया नाही असा हताश डॉयलॉग मारण्यापेक्षा "सत्य मेव जयते" हाच विश्वास अन् हीच अपेक्षा ठेवत संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे "सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिलीये नाही बहुमत" एवढे तरी आपण नक्कीच करु शकतो.
संदिप महामुनी.

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८
पुलोत्सव....!
पुलोत्सव...!
वस्तू,व्यक्ती,समाज,भूभाग वैगरे याचे विविधांगी निरीक्षण अन् त्याचं खुमासदार नर्म विनोदी परिक्षण करणाऱ्या अलौकिक दृष्टीने भारावून टाकणारे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. वृत्ती.
खटकणाऱ्या गुणधर्मा सहित वेगळेपण विनोदबुद्धीने स्विकारण्याची कला म्हणजे पु ल प्रवृती.
नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात निराशेच्या ,असमाधानाच्या क्षणांनी वैतागलेल्या भावनांना हमखास सुसह्य करणारी गुरुकिल्ली असणे म्हणजे पु ल संस्कृती.
अश्या वल्ली व्यक्ति चे स्मरण म्हणजे हास्याची कारंजी,विनोदाची फुलबाजी अन् आनंदाची दिवाळी गरज असते फक्त आपण आनंदयात्री होण्याची....

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८
LIFE ...
Life
What's it..? we always want to know, we are just thinking, we even don't know from where we start thinking it's all about journey to evolve oneself physically and emotionally. Every day comes with something new, something different. Day by day we are moving towards so called maturity but we are matured abt our past experiences only with respect to unique environment of physic & emotions which we aware of but never prepared for the unexpected,sometimes unwanted incidents. As maturity has no age bar as we grow we try to control our emotions publicly that's we learns from & its action depend upon own guess works abt how others ll think or reacts.
Person with whom we live automatically engulfed with their smells either knowingly/ unknowingly we follow them or we try to change them according to our habits but we forget that instead of point out someone's naturalistic way to change, exchange our point of views is better.
In present we always has sense to correct our past and cautious abt future but there is no use. If you become unhappy due to past life & fear abt future then you are wasting your precious happy and fearless present. As per my opinion we never ever perfect to every situation as all do's and don't are ideological so need to be normal to react & accept the surprises that's LIFE.

रविवार, ९ सप्टेंबर, २०१८
कलम ३७७ उपेक्षित समानतेचा जागर....
नुकताच न्यायालयाने अनैसर्गिक शारीरिक संबंधीचे गुन्हेगारी कलम ३७७ रद्द केले त्यामुळे समलैंगिक संबंध हा कायदेशीर गुन्हा राहणार नाही.एका अर्थाने न्यायपालिकेचे अभिनंदनच केले पाहिजे कारण बहुमत पद्धती स्विकारलेल्या आपल्या देशात व्यक्तिगत हक्काचे महत्व अधोरेखित केले आहे अन् ते मान्य करताना " I am what I am, so take me as I am." या जर्मन तत्ववेत्त्याच्या विधानाचा आधार घेतला आहे.
या निकालाचा LGBTQIA+ संबंधित लोकांना आनंद होणे स्वाभाविक आहे परंतू ह्या आनंदाचा अतिरेकी बाजार अथवा उन्मादी उदात्तीकरण करायची काही एक गरज नाही कारण या निकालाचा अर्थ तुमच्या वैयक्तिक आवडी-निवडी खाजगी पातळीवर स्विकार्हाय असतील परंतू कुणाही तिसऱ्याला अथवा समाजाला हानीकारक असता कामा नये हा सर्व सामान्यांना असणारा नियम त्यांना सुद्धा लागू आहे.
वास्तविक मानवी व्यवहाराचे प्रकृती, विकृती अन् संस्कृती या तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे.जे नैसर्गिक ते प्राकृतिक पण काही न समजू शकणाऱ्या कारणांमुळे नैसर्गिक गोष्टीतही बदल घडतो ती इतरांच्या तुलनेत विकृती असू शकते परंतू त्याच्या दृष्टीने ते नैसर्गिकच असते परंतू व्यक्तिगत आवड_निवड जोपासताना इतर बाबींवर प्रतिकूल परिणाम होणार नाही यासंबंधी जागरूक राहून स्वतः सार्वजनिक साधनसुचिता पाळणे ही असते संस्कृती याचा विचारीजणांना विसर पडता कामा नये.
बहुमत असणाऱ्यांनी इतरांचे वेगळेपण मान्य करत असताना इतरांनी समलैंगिकतेतून नैसर्गिक प्रजोत्पादन होऊ शकत नाही तो केवळ चार भिंतींच्या आतील वैयक्तिक आनंद अथवा समाधानाचा भाग आहे हे स्विकारले पाहिजे.त्या गोष्टीचे उदात्तीकरण न करता आपापल्ये
सर्वसामान्यपण जपले पाहिजे.
न्यायालयाने प्रत्येक व्यक्तिगत हक्काची दखल घेत केलेला निर्णय हा उपेक्षित समानतेच्या भल्यासाठी घेतला आहे त्याचा योग्य प्रकारे जागर झाला पाहिजे.
गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८
प्रतिज्ञेचे पाईक.....!
प्रतिज्ञेचे पाईक.....!
शाळेतील कळत्या वयापासून पुस्तक पाहत आलोय अन् परिक्षेतील गुणांसाठी व प्रगती-पुस्तकातील शेऱ्यासाठी पहिली तीन पाने सोडून त्यातील पहिला धडा सुरू होतो हेच शिकवलं होतं पण पहिल्या तीन पानापैकी एकावरील राष्ट्रगीत अन् दुसऱ्या वर प्रतिज्ञा बद्दल जगाच्या शाळेत उपयुक्त शैक्षणिक संस्कार काय झाले नाहीत केवळ शाळा सुरू होताना रोजच्या घोकंपट्टीचे सोपस्कार मात्र चालूच राहिले.भारतातील प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने भारतीय बनवणाऱ्या प्रतिज्ञेचे महत्व केवळ पुस्तकी उपक्रम उरल्याने अनेकांच्या मनात खालील प्रतिज्ञाच घोळत राहतीय
भारत माझा अन् फक्त माझाच देश आहे।
सारे स्वधर्मीय माझे बांधव आहेत।
माझ्या जातीवर माझे प्रेम आहे।
माझ्या घरातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या फायद्याच्या माणसांचा मान ठेवीन
आणि त्यांच्याशीच सौजन्य दाखवेन ।
माझाच देश आणि माझेच बांधव
यांचीच पाठराखण करण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
ही विचारसरणी आपल्याच देशात नव्हे तर जगात फोफावत चाललीय अन् ती धोकादायक बाब आहे यासाठीच देशाची प्रतिज्ञा केवळ पुस्तकात छापण्या पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली पाहिजे तरच भावी काळ विविधतेतून एकतेचा असेल.
जय हिंद !
रविवार, २६ ऑगस्ट, २०१८
अद्वैताचा साक्षात्कार
परमेश्वर ही संकल्पना आस्तिकतेशीच निगडित असते हा नास्तिकतेचा समज असू शकतो परंतू निरपेक्ष प्रेम भावनेने अद्वैताचा साक्षात्कार होऊन भक्तिरसात न्हाऊन निघणे ही नैसर्गिक आत्मिक ओढीची आस असू शकते अन् ती सकल जनांना सारखीच असते भले ते नातं दृष्य-अदृष्य स्वरुपाचे असो...
विठ्ठल भक्तांसाठी विठ्ठल म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर अजय गोगावले यांच्या लेखणीतून अन् अजयअतुल यांच्या संगीतमय अश्या माऊली माऊली या गाण्यातून मिळाले नाही अन् ते अर्थपूर्ण ऐकताना भक्तांची आर्त साद काळजाला भिडली नाही तरच नवल.....
गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८
मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८
सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८
Unequal pillars of social democracy
Unequal pillars of social democracy
Today's world is world of information which makes everybody equipped with awareness about many things at the same time & each age group equally due to easy availability of tools to access it. Instead of individuals requirements rather it is agenda of service providers ( TRP driven media ) which acquire their thinking processes & channelised its patterns which converts referendum towards their end.
As having information doesn't mean knowledgeable one, because sorting & analysing of information with your conscience is important. The logic behind the way you think is your subconscious mind developed in relative circumstances i.e. your upbringing which matters a lot but never be a slave to logic rather answer for it.
Due to lack of harmony, people's views towards nationalism is like wave circles, they're mixed interpretation of own ideology about caste, religion, statehood, politics (as political parties commonly had no fix ideology rather than elective measures ) etc. And these people are from every sector of govt /non govt machinery & their remarks departure from accepted practice which promotes cultural nationalism & had wider ramifications with damaging letter & spirit of constitutional arrangements which extremely unacceptable.
As legislature,executive,judiciary and media are considered four pillars of democracy now IV-B is social media which is an additional backing or support pillar which affect other pillars in terms of level of thinking which effects their equality in terms of ethics. These inequalities of pillars harmful to structure of so called democracy & constitutional functionaries.
On the eve of the independence day this freedom of information & expression needs filter of neutrality.
Their is difference between my India & only my India. Citizen engagement by pick flaws & ill acts fuelling by rumours or stigmatised entire society for someone guilty belong to the same section as right & left extremists both are obsessive dashed off opine & front for shape the country on their terms & conditions. As their is rough road to travel instead of being victims of the black propaganda we have to change information driven country to ethical knowledge driven country to support democratic structure equally balanced. Patriotic brings responsibility & nationalist makes blind egos so be a part of the India & be an Indian.
Sandeep Mahamuni.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)