शुक्रवार, १२ जुलै, २०१९

माऊली..माऊली..माऊली..



 ज्ञानीया वारीच्या उगमाची होई इथे सांगता
अंतरंगाची ओढ फक्त तुझ्या दर्शनाची आता

"बा विठ्ठला तु जगाचा होऊनी
आज भेटी मज तु माऊली रूप घेऊनी"

माऊली ..माऊली ..माऊली..


#NaturalDiamonds.....

#NaturalDiamonds
... 

सोमवार, ८ जुलै, २०१९

#GoogleGuy.....


       गोगलगाय अन् पोटात पाय असे म्हणतात पण आजकाल च्या धावपळीच्या आयुष्यात ते संथ व शांतपणे जगण्याची गरज शिकवणारी  #GoogleGuy




सोमवार, १ जुलै, २०१९

#Yellowism



       

Yellowism is an autonomous phenomenon in contemporary visual culture. It derived from the visual arts and despite this fact, is not classified as art, what is in accordance with its essence.
Yellowism: 'Neither art, nor anti-art . . . it is about yellow'
'Examples of Yellowism can look like works of art, but are not works of art




बुधवार, १ मे, २०१९

माझ्या तमाम मराठीबांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

माझ्या तमाम मराठी बांधवांना 
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....




मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजत मागे सरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
वादळापरी आम्ही पुढेच चालतो,
जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो
मराठा कधी न संगरातुनी हटे,
मारुनी दहास एक मराठा कटे
सिंधु ओलांडूनी, धावली संगिनी, पाय आता न मागे फिरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
व्हा पुढे आम्हा धनाजी, बाजी सांगती,
वीर हो उठा कडाडतात नौबती
विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी,
पूर्वजांपरी आम्ही अजिंक्य संगरी
घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी, मृत्यु आम्हा पुढे घाबरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
भारता आम्ही तुलाच देव मानतो,
हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो
राखतो महान आमची परंपरा,
रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो धरा
ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, आमची वीर गाथा उरे
मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला भरे कापरे
देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजत मागे सरे



बुधवार, २४ एप्रिल, २०१९

पोरकट लोकशाहीचा थुकरट उत्सव....


              अतिशय उदात्त अन् उमद्या हेतूने प्रेरित लोकशाहीचा स्विकार आपण केला त्यासाठी आवश्यक अन् उपयुक्त संविधान देखिल लागू केले. जनतांत्रिक प्रक्रियेतून लोकप्रतिनिधींची निवड केली जात खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य यावे म्हणून आपण आग्रही राहिलो. परंतू आज ७० वर्षानंतरही केवळ ५०-६०% मतदान होत असेल तर आपली लोकशाही खरचं सुदृढ झाली का रोडावली. केवळ लोकशाहीचा उत्सव म्हणत सोपस्कार अन् सोयीस्कर मानसिकतेचे प्रदर्शन मांडणार असू तसेच उदासीन राहणार असू तर आलेल्या परिस्थितीला दोष देण्याचा अधिकार आपण गमावून बसतो.
आजदेखील उमेदवारांची पात्रता ही कागदोपत्री अन् निवडून येण्याची कसब यावरच आधारित असेल अन् तथाकथित सत्ताभिलाषी राष्ट्रीय पक्ष देखिल संख्याबळाचा डाव खेळत असतील तर जनता जनार्दनाचे नव्हे आकडेमोड करणाऱ्या हिशोबनिसांचेच सरकार येणार. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख असो की महिन्याला ६०००रुपये आमचं ठरलय,स्टाईल ईज स्टाईल अशा जुमल्यावर किंवा टॅग लाईन व व्यक्तिगत खालच्या पातळीवरील टीका यावर जर निवडणूकीच वारं फिरत असेल तर मग जाहीरनामा, वचननामा याचा एका बाजूला सोपस्कार अन् दुसऱ्या बाजूला सोयीस्कर विसर पडणारच.
निवडणूक आयोग व तिची कार्यप्रणाली म्हणजे बिगबॉस मालिकेतील त्या अज्ञात व्यक्ति प्रमाणे नियमाचं तुणतुणं वाजवत अधिकाधिक प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल ते पाहायचे एवढीच उरते. मला वैयक्तिक निवडणूक आयोग भारतीय मतदारांना अल्प बुद्धी गृहीत धरून अथवा स्वतःच्या बुद्धीने निर्णय न घेणारा अस समजत नियम बनवतो असे वाटते. जनता देखिल स्वतःला तसेच समजत वागते मग प्रगल्भता येणार कोठून. कुठला पुतळा आहे हे ही माहित नसणारे अन् त्याकडे ढुंकूनही न पाहणारे पायरीला पाचशे असताना निवडणुकी पुरते पुतळे झाकून इति कर्तव्य बजावल्याचे समाधान मानण्यात काय हशील. हात चिन्ह असेल तर सगळ्यांनी ते खिशात ठेवायचे काय.
ईव्हीएम मशीन असो की मतपत्रिका जोपर्यंत मतदानाचा खरा उपयोग अन् ताकद समजत नाही तोपर्यंत त्या प्रक्रियेचा फायदा उठवणारेच अग्रभागी राहणार अन् बाकीचे मेंढरासारखे फरफटत जाणार.
जोपर्यंत मुलभूत शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत नाही अन् सुज्ञ मतदारांचा टक्का वाढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रौढ लोकशाही निर्माण होणार नाही. मग अशा पोरकट लोकशाहीचा उत्सव साजरा करणे म्हणजे थुकरट विनोदच ठरतो. 

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

निरागसपणा....

            
         
  
            मिझोरम मधिल एक मुलगा सायकल चालवत असताना त्याच्या सायकलखाली कोंबडी चे पिल्लू आले तेव्हा ते पिल्लू घेऊन तो थेट दवाखान्यात गेला अन् जवळचे सर्व पैसे देत त्या कोंबडीच्या पिल्लावर उपचार करा असे तेथील कर्मचाऱ्यांना सांगू लागला. तेव्हा ते आश्चर्यचकित तसेच भावूक झाले. 
ज्या निरागसपणे त्याने कृती केली ती कौतुकास्पद तर आहेच पण मोठ्यांना बोध देणारी आहे. 
Innocence is "u r not afraid about ur guilt but accept it bravely  & try to repair it with all ur efforts" 
Mistakes r uncontrollable & uncomfortable too but keep innocence & be innocent life is beautiful.... 

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

तारुण्याच वारं की तारुण्याचा वारू...


              चकाचक आयुष्यात कचाकच भरलेला सेक्स अन् पचापच थुकाव तस शिव्यांनी बरबटलेले बोलणे म्हणजे आजकालच्या पिढीची कलात्मक स्वातंत्र्य अन् सो कॉल्ड स्पेस ची वास्तववादी कल्पना. या मार्गाने जाणारी प्रत्येक गोष्ट आपलीशी मानने, हक्काची समजणे अन् तेच खरं बेफिकीर जगणं वाटणे हे ठराविक वयाच्या बेभान उसळत्या रक्ताचा जागतिक तोंडावळा असतो अन् थोड्याफार फरकाने सर्वांना तो लागू असतो. फरक आहे तो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील समाज माध्यमाच्या सुकाळाचा. आज वास्तव अन् अभासी यातील पुसटशी रेषा या माध्यमांनी केव्हाच पुसून टाकली आहे. आपल्याच प्रतिध्वनींच्या कोषातून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यातून निर्माण झालेल्या एकाकी बुद्धिमत्तेचा निष्कर्ष त्यांना एकीकडे एकलकोंडे तर दुसरीकडे दुभंगलेल्या मानसिकतेचे बनवत आहे. अशांना मग आयुष्य जगताना थिल्लरतेचेच आकर्षण व थिल्लरतेचाच आदर्श वाटतो. मग त्यांना शिस्त अन् सुसंस्काराच्या गोष्टी नेभळटपणाची लक्षण वाटतात. तेव्हा प्रचार नावाची यंत्रणा व राजनीतिक धोरण तज्ञ अशांना गृहीत धरून स्वतःच्या हातचे बाहुले बनवत स्वतःचीच विषयपत्रिका (अजेंडा ) राबवतात.  मग दुधारी शस्त्रा प्रमाणे अशा तरुणांची संख्या राष्ट्राची ताकद न राहता ती राष्ट्रीय समस्या बनते. मनोरंजनातून झालेला प्रवास नकळत मनोरुग्णतेत परावर्तित होत जातो. ही क्रयशक्ती योग्य मार्गाने हाताळणे हे शासन म्हणून राज्यकर्त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्याऐवजी त्यांना भुलथापा देऊन सत्तेसाठी चुचकारण्यावर भर देणारे व त्यासाठी आगतिक झालेले लोकनेते होण्यातच धन्यता मानणारे कसला देश घडवणारेत त्यांनाच ठाऊक. तरूणांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सबलीकरण हाच खरा विकासाचा पाया आहे अन् त्यावरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा तारूण्याच वारं वाहू द्यायचे का तारूण्याचा वारू दौडावयाचा हे त्यांनीच ठरवायचे आहे. 

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

नैतिकतेचे गोडवे अन् सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्रा...

नैतिकतेचे गोडवे अन् सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्रा...
               भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. काही ढोबळ निकषांनुसार हे सत्य असले तरी खरोखरीच तसेच असेल व त्याचा देशातील शेवटच्या घटका पर्यंत लाभ होत असेल याची खात्री देता येत नाही.आतमधे पोकळ, किडलेल्या व्यवस्थेला वरवरची मलमपट्टी करण्यात धन्यता मानणारे व सगळे आलबेल आहे असे भासवणारेच अधिक.
सध्या या लोकशाहीचा उत्सव निवडणूकीच्या माध्यमातून साजरा होणार आहे अस अलंकारिक भाषेत तथाकथित बुद्धिजीवी म्हणत असले तरी सामान्यपणे लोकशाहीचा अर्थ अन् निवडणूकीच्या माध्यमातून अपेक्षित मतितार्थ खरच कळत असेल असे मला वाटत नाही.स्वार्थाचा झेंडा घेणारे व देणारे उन्मादी उत्साहित लोकशाहीचा खरा उत्सव साजरा करण्यापेक्षा एक सोपस्कार एवढ्याच मानसिकतेतून पाहत असतात.
सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी तर विरोधी पक्ष सत्ता मिळवण्यासाठी आतूर असतात मग त्यासाठी साठमारी ते हाणामारी अन् फोडाफोडी ते तडजोडी सर्व पर्याय खुले असतात कारण सर्वसामान्य जनतेला तिच्याच कर्मदरिद्र्यामुळे गृहीत धरलेले असते. नुकत्याच एका जेष्ठ अशा जाणत्या राजाने मी माझ्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकतो परंतू दुसर्‍याच्या घरातील बालहट्ट पुर्ण करू शकत नाही असे वक्तव्य केले तसेच दुसर्‍या मर्द मराठी सेनाप्रमुखाने आम्ही स्वतःच्या मुलाबरोबर दुसर्‍यांचेही लाड पुरवतो असे सांगितले यावर तिथे हशा अन् टाळ्या झडल्या अन् ते बघणाऱ्याला व ऐकणाऱ्यांना त्यांच्या हजरजबाबी वक्तृत्व कलेचे कोण कौतुक वाटले.एवढीच आपली प्रगल्भ भुमिका.परंतू प्रगल्भ लोकशाहीसाठी असणारी निवडणूक प्रक्रिया ही काय बायका-मुलांचे हट्ट अन् लाड पुरवायला आंदण दिले की काय?  असा प्रश्न मतदाराला किंवा पक्षाच्या हाडाच्या कार्यकर्त्याला पडत नाही हीच लोकशाहीची खरी शोकांतिका आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यां पासून मतदारां पर्यंत सर्वांना गाजर दाखवत खिशात ठेवण्याची किमया त्यांना चांगलीच अवगत आहे.मग असले लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे राजकारणी जन सेवक नसून वरकरणी चुचकारणारे सत्ता सेवकच असतात.
उघड उघड स्वार्थकारण करणारे पैशाच्या व संस्थेच्या मक्तेदारीमुळे तसेच लाचार व तुमच्या साठी कायपण म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे फुरफुरत असतात अनैतिकतेचे पाढे गिरवणारेच तथाकथित नैतिकतेचे गोडवे गात असतात.खरी लोकशाही अंगी बाणवायला मात्र सद्सद्विवेकबुद्धीची कडू मात्राच घ्यावी लागते.