गुरुवार, १७ मार्च, २०१६

सावधान ! काळ सोकावतोय ....

                                              सावधान ! काळ सोकावतोय......

            नुकत्याच चर्चेत असलेल्या बातम्या पाहता देशात नेमकं चाललंय काय हा प्रश्न पडतो. विजय मल्या नावाचा रंगेल उद्योगपती तथा माननीय खासदार देशातील १७ बँकांचे नऊ हजार कोटी कर्ज (ऐकूनच डोकं बोजड होतंय) न चुकवता यंत्रणांच्या नाकावर टिच्चून १३ सुटकेस घेऊन निघून जातो.अन् आपले CBI खाते कोर्टात डिटेंशन एवजी लुक आउट नोटिस काढल्याच्या चुकीची कबुली देत मल्या पळून गेला हे निलाजरेपणे सांगते. तो मात्र लंडन मधून मी पळालो नाही मी काही चुकीचे केले नाही ( कारण माझ्यासारख्या बलाढ्य माणसाने कर्ज घेऊन बँकावर उपकार केले आहेत अन् बँकादेखिल असा असामी कर्जदार लाभल्यामुळे उपकृत झाल्या होत्या असाच त्याचा अविर्भाव आहे ) तसेच मीडियाने मला लक्ष्य न करता मी त्यांच्यावर केलेल्या खैरातीची जाण ठेवा असा उपरोक्त सल्ला देणारी टिव टिव केली.
        रघुराम राजन सारख्या कर्तव्यदक्ष गवर्नरनी कोणत्याही दबावाची तमा न बाळगता सततची कर्जाची फेररचना न करता सर्व खाती व्यवस्थित करण्यासाठी बँकावर लादलेल्या आदेशामुळेच बँकांनी विजय मल्याच्या पाठी तगादा लावला व त्याचेच पर्यवसन त्याच्या पळून जाण्यात झाले.
           दुसरीकडे सरकारी संत श्री श्री ( सामान्यांसारखे एका श्री ने यांची स्तुती पुर्ण होत नाही ) रविशंकर जगाला आर्ट अॉफ लिविंग चे धडे देण्यासाठी एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात सपाटीकरण करीत झाडे झुडुपे तोडून तसेच काही ठिकाणी पात्राची दिशा बदलून नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान करण्यास कारणीभूत झाले असताना त्या विरोधातील याचिकेची हरित लवादाकडून दखल घेत त्यांना ५ कोटींचा दंड ठोठावला परंतू या आधुनिक संतानी एक छदाम देणार नाही हवे तर अटक करा असा उद्दामपणा दाखवत नविनच कला भक्तगणांना शिकवली परंतू लगेच जमिनीवर येत २५ लाख रू भरत उर्वरित रक्कम हफ्त्याने भरू असे सांगितले. वास्तविक कोणत्याही दंडाने पर्यावरणाचे नुकसान भरून येऊ शकत नाही.शिवाय हरीत लवादाने २५ लाख रू जमा करत उर्वरित रक्कम माफ केल्याचे ऐकिवात आहे तसे असेल तर हरीत लवाद दबावापुढे झुकून काम करीत आहे या शंकेस वाव आहे.तेव्हा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे सांगणाऱ्या आपल्या पुर्वश्रमीच्या संतांची शिकवण आपण केव्हाच मातीमोल केली असून आधुनिक संतांसारखे भव्य दिव्य ईवेंट साजरे करीत समाजाचे आध्यात्मिक भले करण्याच्या नावाखाली सत्ताधारी मुजोरपणाच बाळगण्याचे जगण्याचे तंत्र मिळवले आहे व त्याचाच उदो उदो करण्याचे काम भक्तगण भक्तिभावाने करतीलच.
        महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सर्वच अनाधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा करीत दंडरूपी महसूल गोळा करण्याचा फंडा तसेच आगामी महापालिका निवडणूक असा दुहेरी उद्येश  साधला आहे. तेव्हा ज्या गोष्टीला चाप बसला पाहिजे त्याचे शुद्धीकरण करण्याचे राजकारणी तंत्र जनतेला मिळत आहे.
            एकिकडे झटपट फुकटात प्रसिद्धि मिळणाऱ्या विद्यार्थी नेत्याकडे देशाचे लक्ष वेधले जात असताना ९३ च्या बॉम्बस्फोटातील एक महत्वपूर्ण आरोपी तब्बल१५ वर्षांनी २००४मधे  मिळालेल्या त्याच्या थोड्याश्या माहिती वरून मुंबई पोलीस युनीट ६ ने त्याला शिताफीने अटक केली परंतू प्रामाणिक पोलिसांना प्रसिद्धी तर सोडाच त्या आरोपीवर CBIने ठेवण्यात आलेले बक्षिस आजअखेर जवळ जवळ १२वर्ष मिळाले नाही शिवाय बक्षिसाच्या रकमेसाठी कायदेशीर पाठपुरावा करण्याची वेळ त्यांच्यावर येत असेल तर एक तपास यंत्रणा दुसऱ्या तपास यंत्रणेच्या कार्यतत्परते बद्दल असंवेदनशील आहे याचेच प्रदर्शन मांडत आहे.
             मग विजय मल्या, आधुनिक संत रविशंकर, राज्याचे सर्वेसर्वा, तपास यंत्रणा सर्वच जण आपापल्या भातावर डाळ ओढण्यात मश्गूल आहेत ' गरज सरो अन् वैद्य मरो ' असेच सुविचार त्यांना अभिप्रेत आहेत.व्यवस्थेत शिरलेली सुस्त व भ्रष्टाचारी मानसिकता व त्याचा पुरेपूर फायदा उचलणारा विजय मल्या वर्ग हे कशाचे द्योतक आहे त्यातून जगातील सर्वाधिक युवा तसेच सोशल मीडियावर एखाद्या घटनेबाबत मनोरंजनापुरते मर्यादित राहणाऱ्या पिढीला कोणता आदर्श मिळतो आहे. "भपकेबाज पणा करून पैसा मिळवा अन् देशाला बुडवून अय्याश जीवन जगा किंवा पर्यावरणाचे, सरकारी नियमांचे हवे तसे उल्लंघन करा नंतर सटर फटर दंड भरून त्या गोष्टी नियमित करून घेत समाजात प्रतिष्ठित पणे मिरवा ."मात्र रघुराम राजन यासारखे केवळ महत्वाकांक्षी व सतशिल न राहता ठाम, न डगमगाता, दबावाला अथवा हितसंबध या गोंडस आमिषाला न बळी पडता कर्त्तव्यतत्पर राहणाऱ्या तसेच १५ वर्ष जुना तपास सुद्धा तेवढ्याच हिरीरीने करणारे उमदे व प्रामाणिक पोलिस कर्मचारी हे आदर्श जरी मोजके असले तरी 'कर्त्तव्यदक्ष राहून देशसेवे साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा सुविचार आपल्या देशाला जगात उज्वल भविष्य निर्माण करू शकेल.
            परंतू अति प्रमाणात घडणारे भ्रष्ट आचरण व कुठेही कठोर शासन होत नाही असा संदेश समाजात पसरतोय व तो समज दृढ़ होत आहे तेव्हा आपल्या सत्ताधाऱ्यांनी तसेच प्रशासनानी शिवाजी महाराजांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ही काळाची गरज आहे कारण आप्त स्वकियांकडून स्त्रीच्या शिलावर झालेला अत्याचार कदापीही न सहन करता व कोणतीही भिडभाड न ठेवता अशा नराधमाचे हातपाय तोडण्याचे असो की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे महसूल कर्मचाऱ्यांना दिलेले आदेश असो त्यातून नैतिक तसेच कर्त्तव्याबाबत योग्य तो संदेश महाराजांनी त्यांच्या कृतीतून समाजाला दिला होता. त्याचीच नितांत गरज सद्यस्थितीला जाणवते आहे अन् त्याचीच वाणवा आहे.
         तेव्हा चुकीच्या गोष्टी घडण्याबद्दल दु:ख नाही तर त्यानां समर्थनीय प्रशासन व राज्यकर्ते हा संदेश घातक आहे. म्हणूनच म्हातारी मेल्याचे दु:ख नसते तर काळ सोकावता कामा नये हे महत्वाचे अन्यथा अराजकता दूर नाही.
तेव्हा सावधान ! काळ सोकावतोय ....
संदिप महामुनी
९६३७१३०२०६
http://www.sandeepmahamuni.blogspot.in

   

बुधवार, २ मार्च, २०१६

स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........!

                                 
                                                   स्थितप्रज्ञस्तदोच्यते ...........! 

                 थोड्या दिवसापुर्वी बेंगलोर येथे एक २३वर्षीय 'हरीश निंजप्पा' नावाचा युवक निवडणूक मतदान करून देवदर्शनाला चालला असताना त्याच्या दुचाकीस ट्रकची धडक बसून त्यात त्याचे अक्षरशः दोन तुकडे झाले. परंतू पुढील ३० मिनिटे तो जिवंत होता अन् मदती साठी लोकांना अवाहन करीत होता. काहींनी याचा व्हिडिओ देखिल बनवला परंतू तात्काळ मदतीच्या बाबतीत त्याची निराशा होत होती.शेवटी काही लोकांनी रूग्णवाहिका बोलवून त्यातून त्याला दवाखान्यात पोहचवण्याची व्यवस्था केली.ह्या दरम्यान रूग्णवाहिकेतील नर्सशी हरीश जे बोलला ते मन सुन्न करणारे व संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवर विचार करायला भाग पाडणारे होते.तो म्हणाला
             " मी आता जगू शकणार नाही हे मला माहित आहे पण मी मेल्यानंतर माझा समाजातील काही गरजू लोकांना उपयोग झाला पाहिजे त्यासाठी माझे अवयव दान करा."
                स्वतःला इतका भयंकर अपघात झाल्यावर जिथे शुद्धीत राहणे हेच आश्चर्यकारक असताना तुमचा विवेक जागृत ठेवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. यातुनच त्याची वैचारिक स्पष्टता तसेच स्थितप्रज्ञता कमालीची प्रगल्भ असल्याचे ते द्योतक आहे. अखेर तो गेला व त्याच्या ईच्छेनुसार अवयवदान सुद्धा झाले. त्याच्या मावशीने 'हरीशचा आम्हाला अभिमान आहे' अशी मोजकीच पण बरेच काही सांगून जाणारी प्रतिक्रिया दिली.
               स्वतः मृत्यूच्या दाढेत असताना दुसऱ्यांच्या हितांचा विचार करण्याची दातृत्व वृत्ती ह्यातून त्याची जडणघडण किती सुस्पष्ट विचारधारा व प्रगल्भ सामाजिक जाणीवांच्या सुसंस्कारात झाली असेल याची कल्पना येते.
              एकिकडे समाजात र्निमाण होणारी तेढ,फुट पाडणारे गट, तोंडदेखली सोशल मिडिया पुरती सामाजिक जाणीव ,अस्थिर करणारी विचारधारा व त्याचा प्रसार अशा अनेक गोष्टींची बजबजपुरी झाली आहे. त्यात हरीश निंजप्पा सारखे तरूण म्हणजे मिणमिणता का होइना आशेचा किरण अजून शिल्लक आहे याचीच प्रचिती देत आहेत.
आपण नेहमी एकतो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही त्याला समुहाची आवश्यकता भासते. परंतू ह्या बरोबरच मानवाला निसर्गाने इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करणारा मेंदू दिला आहे. तसं प्राण्यांना दिलेला नैसर्गिक क्रियेसाठी आवश्यक मेंदू अन् मानवाला मिळालेला अधिक कार्यक्षम मेंदू यात नक्की कोण योग्य आहे हा प्रश्न मला तरी अनुत्तरित आहे. कारण अधिक वैचारिक क्षमते बरोबर अधिकची सामाजिक, निसर्ग याविषयीची जबाबदारी देखिल आपलीच आहे याची जाणीव खरच रूजली आहे का ? ती रूजवण्यात काय कमतरता आहेत याचा धुंडोळा संवेदनशीलपणे घेतला गेला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर तो आवश्यक आहेच पण सामाजिक पातळीवर या विषयाशी निगडित शिक्षण जे वेगवेगळ्या सरकारी खात्यांतर्गत देणे जसे शिक्षण, आरोग्य, रस्ते सुरक्षा वैगेरे हे केवळ कागदोपत्री सोपस्कार न राहता लोकांच्या वर्तणूकीतून ते परावर्तित झाले पाहिजे.
            नुकत्याच महिला वाहक, पोलिस तसेच अन्य धर्मिय पोलिस अधिकारी यांच्यावर उनमत्त चवऱ्या बहाद्दरांकडून घडलेले हल्ले  व इतर सुज्ञांचा तटस्थपणा ( भ्याडपणा ) हे सामाजिक भानाची घसरलेली पातळी अधोरेखित करते आहे. तेंव्हा सुसमाजाची र्निर्मितीसाठी व्यक्तिगत पातळीवर तसेच शासन पातळीवर गांर्भियाने विचार झाला पाहिजे व त्याची तत्परतेने अंमलबजावणी केली गेली पाहिजे. तरच एक नागरिक म्हणून समाजात वावरताना आपली कर्तव्ये कोणती आहेत व तशा प्रकारचे योगदान देण्याची सहजप्रवृत्ती अंगिकारली गेली पाहिजे. नागरिकशास्त्राच्या पुस्तकातील मुलभूत कर्तव्ये केवळ परिक्षेपुरती पाठ करून प्रत्यक्षात वागताना मात्र त्याची वाणवा असेल तर कर्मभोग अटळ आहेत. शैक्षणिक कार्यभागातील पुस्तकी ज्ञानाने मनुष्य प्रगल्भ होतोच असे नाही. ते केवळ त्याच्या अंर्तमनाने त्या गोष्टी किती जाणीवपूर्वक स्विकारल्या आहेत यावर ते अवलंबून असते.
           हरीश निंजप्पा याच्या नावातच हरीचा ईश असला तरी त्याच्या कृतीतून असामान्य अशी उच्चतम स्थितप्रज्ञता तसेच दातृत्व गुण त्याला खऱ्या अर्थाने देवत्व प्राप्त करून देतात व आपल्या सारख्या मानवाला ते प्रेरणादायी आहेत.
हरीश चा प्राण गेला पण त्याचा विचार अमर रहे हीच त्याला प्रार्थनारूपी श्रद्धांजली !

मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

मनाचा शोक...!


                              मनाचा शोक....!

            नविन वर्षाच्या सुरवातीलाच पठाणकोटच्या हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाला अन् नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सर्तक झाल्या. बैल गेला अन् झोपा केल्याचा प्रकार आणखी किती दिवस चालू राहणार ह्या प्रश्नानी मन व्यथित होत आहे. केवळ सहा दहशतवादी सीमे पलीकडून येतात व भारतातील सर्वात मोठ्या हवाईतळावर हल्ला चढवत सैन्याला ४-५ दिवस झुलवत ठेवतात, एवढा शस्त्रसाठा तसेच त्याप्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याकडे असते.अन् खेदाची बाब म्हणजे एक कर्नल व सहा निवृत्त जवानांचा ( त्यात एक NSG कमांडो होता) बळी जातो, हो बळीचं ! सरकार कितीही त्यांनी हौतात्म्य पत्करलं म्हणत व्टिट करित असले तरी हा आपल्या ढिसाळ व अपरिपक्व धोरणांचे फलितच आहे.
           २००० साली IC814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारला नेण्यात आले होते तेव्हा तीन महत्वाच्या अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवाशांच्या सुटका केल्या होत्या.त्यानंतर २०१६ मधे पठाणकोटवर म्हणजे संरक्षण दलाच्या महत्वाच्या ठिकाणावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यावेळच्या हल्ल्याचा  व आताच्या घटनेचा सुत्रधार हा जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख मसुद अजहर हाच आहे. या दरम्यान संसदेवरील हल्ला, मुंबईवरील हल्ला अशा घटना घडतच होत्या. पावसाळा आला की घर बांधायची आठवण होणाऱ्या गोष्टीतल्या त्या माकडासारखे आपण आरंभशूरपणे कृती करत पुन्हा सुस्त होतो.
            गेल्या २६ वर्षात देशात १३६ हल्ले झाले त्यातील १२१ निरपराध लोकांवर तर १४ महत्वाच्या व्यक्तींवर झाले असुन त्यात २००० लोकं मारली गेली तर ६००० लोकं जख्मी झालेत.सीमेवर आपले जवान जीवाची पर्वा न करता लढतात परंतू देशांतर्गत लढाई मधे प्राथमिक जबाबदारी ही पोलिस यंत्रणांची असते मात्र पोलिसांची शारीरिक स्थिती,मानसिक स्थिती,उपकरणं, शस्त्र व यासर्वांचे प्रशिक्षण याची किती बोंबाबोंब आहे ते सामान्य माणूस देखिल सांगू शकतो. अतिरेकी AK47 घेऊन येतात तर आपले पोलिस कर्मचारी म्हशीला हुसकावयला गेल्यासारखे काठ्या-लाठ्या घेऊन फिरतात.तुकाराम ओंबाळेंनी कसाबला कसे निशस्त्रपणे पकडले यावर आपल्या यंत्रणांचे पोट भरते. पण अशा साहसी व प्रामाणिकपणे लढणाऱ्यांची आयुष्यं का म्हणून धोक्यात घालायची.
           Anti terrorist squad प्रत्येक राज्यात निर्माण करण्याचे आदेश असताना, Anti terrorist force one या महाराष्ट्राच्या पर्यायाने मुंबईच्या पथका व्यतिरिक्त एकाही राज्यात उपकरणं, शस्त्र व प्रशिक्षणा अभावी ते अस्तित्वात नाही.२००० पर्यंत NSG चे एकमेव ट्रेनिंग सेंटर होते आता ५ केंद्रे झाली असताना २०१२ पर्यंत हेलिकॉप्टर उपलब्ध नाही या सबबी खाली आपल्या black cat कमांडोना त्याचे प्रशिक्षण दिले नव्हते.या गोष्टी आपल्या राज्यकर्त्यांना बोचत नाहीत. जिथे विदेशनिती, सुरक्षानिति म्हणून सत्ताधारी व विरोधी नेते एकत्र येत नाहीत त्या देशाचे दुसरे काय होणार.
          पठाणकोट हल्ला झाला तेव्हा गृह सचिव,गुप्तचर यंत्रणा, रॉ, मल्टी एजेन्सी सेंटर यांच्यात समन्वयाचा अभाव होता अस म्हंटले जातेय. सहा दहशतवादी मेल्यानंतर पत्रकारांना संबोधताना आपले संरक्षण मंत्री म्हणाले सात जवानांपैकी एकच समोरासमोरील लढाईत शहिद झाला बाकीचे तांत्रिक चुकीमुळे गेले. असले हस्यास्पद विधान करून तुम्ही तुमचे नैतिक अपयश झाकू पाहताय इतकेच. जे अतिरेकी मरायलाच आले होते त्यांना कंठस्नान वैगरे घातले असल्या अलंकारी शब्दखेळात तुम्ही तुमच्या धोरणात्मक चुकांकडे साफ दुर्लक्ष करीत आहात.
         अशा दहशतवादी हल्ल्यानंतर नेहमीच त्याच्या कारणमीमांसांची चर्चा रंगते.पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेल्या अचानक भेटी नंतर लगेचच हा हल्ला झाला. मोदींच्या त्या नीतीला त्यांचे समर्थक 'out of box diplomacy' म्हणत होते तर हल्ला झाल्यानंतर त्यांचे विरोधक याला 'mindless diplomacy' म्हणत आहेत.भारत-पाकिस्तान यांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे हा प्रश्न जटिल आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी चालू ठेवणे हा आपल्या मुत्सद्दीगिरीचा भाग पाहिजे परंतू सुरक्षेसाठीची धोरणं व चोख व्यवस्था याची प्राथमिकता आपण कधीच विसरता कामा नये.
         जगातील सर्वात मोठा नववर्ग असणाऱ्या आपल्या देशात या सर्व बाबींची पोटतिडकीने किती पर्वा आहे याबद्दल माझ्या मनात साशंकताच आहे.याचे मुळ सुद्धा आपल्या संस्कारातच आहे कारण आयत्या मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांचा त्याग जबाबदार आहे या गोष्टीची खरी जाणीव नाही म्हणूनच देशातील प्रत्येक नागरिकांनी आयुष्यातील किमान एक वर्ष तसेच वर्षातील एक महिना देशाच्या सैन्यासाठी सक्ती ने दिला पाहिजे तरच सैनिकांच्या खडतर आयुष्याची व आपल्याला मिळणाऱ्या स्वातंत्र्याची खरी किंमत कळेल व त्यातूनच निर्माण होणारे नेते सुरक्षा धोरण राबिवताना खरोखर जागरूक असतील अन् तेव्हांच हल्ल्यानंतर सर्तक होण्या एवजी हल्ल्या आधीच सर्तक होऊन मनुष्य, वित्त तसेच मानहानी टाळू शकू.
         सुजाण नागरिक होण्यासाठीचे सुसंस्कारित मन असण्यासाठी 'मनाचे श्लोक' आहेतच परंतू शिकण्याचे वावडे असणाऱ्यांनी किमान 'मनाचा शोक' तरी समजून घ्यावा.

"eternal vigilance is the cost for the liberty ".

संदिप महामुनी
०९६३७१३०२०६

शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

सत्यापुढे सत्तेचाच शहाणपणा......!

          सत्यापुढे सत्तेचाच शहाणपणा......!

                  'सलमान खान' या एका बॉलीवुड अभिनेत्याची ' हिट अँड रन ' केसमधे  'अपराध कुणी केला?' हा प्रश्न अनुत्तरित ठेवत न्यायालयाने १३ वर्षांनी निर्दोष मुक्तता केल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यां(भक्तां)चे जीव भांड्यात पडले असतील आता जल्लोष करण्यासाठी उताविळ असणाऱ्यांनी हे लक्षात घेणे अत्यंत जरूरीचे आहे की ही मुक्तता सबळ पुराव्या अभावी झाली आहे तेव्हा ते न्यायालयीन अपयश तसेच व्यवस्थेचा दोष आहे.ज्यांना चिरडले त्यांना असंवेदनशील, मुजोर, सत्ताधिश, धनदांडग्या, पैसा फेकल्यावर उभ्या राहणाऱ्या उच्च शिक्षित वकील ,सरकारी अधिकाऱ्यांच्या फौजा असतील तर खरा न्याय मिळणे किती दुरापस्त आहे.
               या केस मधील मुख्य साक्षीदार तसेच सर्वात प्रथम फिर्याद नोंदवली तो सलमानचा अंगरक्षक रविंद्र पाटील यांनी मृत्युपुर्व सलमान विरोधात जी महत्वपूर्ण साक्ष सत्र न्यायालयात नोंदवली ती मुंबई हायकोर्टाने तो हयात नसल्याने(सलमानच्या सुदैवाने) तसेच काही तांत्रिक कारणास्तव ग्राह्य धरली नाही.तसेच घटनास्थळी उपस्थित कमाल खान याची उलट तपासणी घेतली नाही,गाडीचा टायर अपघातापुर्वी फुटला का नंतर फुटला याविषयीचा तांत्रिक अहवाल योग्य प्रकारे सादर केला नाही,रक्तातील अल्कोहल मात्रा तपासणीसाठी २४ तासापुर्वी न घेतलेले नमूने या व इतर निरक्षणांतून सत्र न्यायालयाचे सर्वच निष्कर्ष चुकीचे ठरवत(!!!) उच्च न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सलमान स्वतः निर्दोष नसुन त्यासाठीचे पुरावे सक्षम नाहीत एवढेच.
              डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानानुसार न्यायदेवतेने उदात्त हेतूने डोळ्यावर पट्टी बांधली असुन शंभर अपराधी सुटले तरी एका सुद्धा निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे तत्व अवलंबलेले आहे, तेव्हा सलमान उरलेल्या शंभर पैकी एक असू शकतो ( अर्थात सलमान जर अंर्त:मनाचा आवाज ऐकत असेल तर त्याच्या अंर्त:मनालाच याची शंभर टक्के खात्री देता येइल ) अन् ते देखिल शासकीय कर्तव्य तत्परतेचा लाभधारक असल्यामुळे हेच उच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे.स्वातंत्र्य पुर्व काळात बाबासाहेबांनी मागास वर्गाला उच्च वर्गाकडून ज्या अत्याचार व शोषणाला बळी पडावे लागले त्या विरोधात आवाज उठवत 'शिका,संघटित व्हा व संघर्ष करा' हा मुलमंत्र दिला.६५ वर्षांनंतर आताचा उच्च वर्ग हा केवळ जातीनेच नव्हे तर सत्ता,पैसा, प्रसिद्धी, धनदांडगे यांनी व्यापलेला आहे.तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ केवळ हिरोने चौकड्याचा शर्ट घातला की निळी जीन्स,त्याचे कोणकोणते पै पाहुणे अगत्याने उपस्थित होते, त्याच्या चाहत्यांनी भर उन्हात केलेल्या प्रार्थना कशा कामी आल्या ( आपण साले किती कर्मदरिद्री  त्या चिरडले गेलेल्या निष्पाप जीवांसाठी आपल्या प्रार्थना मात्र कुचकामीच ठरल्या ) सलमानच्या भक्त गणांच्या जल्लोषांचे थेट प्रक्षेपण अशा बातम्यांचा भडिमार करण्यात व्यस्त होत्या.तेव्हा आपण बाबासाहेबांच्या मुलमंत्राचा व्यापक अर्थ घेत नुसत्या नोकऱ्या मिळवण्यापुरत्या डिग्र्या घेण्याला व माहितीला ज्ञान समजण्यास शिकणे न समजता खऱ्या अर्थाने मुलभूत शिक्षण घेतले पाहिजे.अशा सर्वांनी एकी दाखवत संघटित झाले पाहिजे व समाजातील वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष करीत निर्ढावलेल्या व सुस्त व्यवस्थेला ताळ्यावर आणले पाहिजे.
               ' सत्यमेव जयते ' हे आपल्या देशाचे ब्रीद वाक्य आहे. शेवटी विजय सत्याचाच होतो या आपल्या आशेचा (भोळ्या भाबड्या) व्यवस्थेने विनोद केला असून ' बळी तो कान पिळी ' हीच म्हण जास्त सयुक्तिक ठरवली आहे.सत्तेपुढे सत्याचे शहाणपण चालत नाही एखाद दुसऱ्या महात्माने सत्याचे प्रयोग करून देशाला सत्याचे महत्व थोडेच पटणारे.पोटात पैशाची बकासुरी हव्यास असणाऱ्या बेधुंदाना कोण चिरडल काय कोण मेलं काय.चित्रपटात भावनांचा बाजार मांडणाऱ्यांना व त्यांच्या कृत्रिम प्रतिमेला भावूक होत आपण डोक्यावर घेतो अन्  प्रत्यक्षात हीच मंडळी रस्त्यावर झोपणाऱ्या (अभिजीतच्या भाषेत कुत्र्यांना )गरीबांना चिरडतात तेव्हा आपला मुर्खपणा ठळकपणे अधोरेखित होतो परंतू या सत्यापेक्षा भ्रमाची चंदेरी दुनिया आपणास जास्त प्रिय असते.तरी सुद्धा वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे सांगणाऱ्या आपल्या परंपरेवर विश्वास ठेवत न्यायाच्या प्रतिक्षेत आहोतच....!

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

http://www.sandeepmahamuni.blogspot.in

रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

DNA चा झोल अन् डोक्यात केमिकल लोच्या...!

DNA चा झोल अन् डोक्यात केमिकल लोच्या....!

         नुकताच कराड येथील एका राजकीय कार्यक्रमामधे एक वानर सर्व झेड प्लस सुरक्षा व्यवस्था(?)भेदून मंचा समोर जाऊन बसले. व्यासपीठावर नेते मंडळी,खाली वानर. थोडीफार भितीयुक्त मनोरंजन झाले.परंतु माझ्या मनात विचार आला तो म्हणजे वानराला सुद्धा आपल्या उत्क्रांत पिढीतील नेत्यांबद्ल उत्सुकता असावी. मात्र नेत्यांचे साचेबद्ध बोलणं अन् आपणच कसे योग्य तारणहार आहोत ह्या त्यांच्या अर्विभावातून लोकांना गृहित धरून केलेल्या अश्वासनांची भाषणबाजी ऐकून हे अजूनही माकडचेष्टाच करीत आहेत याची जाणीव त्याला झाल्याने काहीशा भ्रमनिराशेने तसेच आपण माकडच राहण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे समाधान मानत ते आले तसे निघून गेले.
          मग मला नुकत्याच बिहार निवडणुकीनंतर शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांचे ' कुणाच्या DNAत मला जाब विचारण्याची हिम्मत आहे 'असे विधान केले होते त्याची आठवण झाली. एखादी गोष्ट करण्यासाठी तुमच्या DNA तच ती असावी लागते असा त्यांचा दावा होता. जाब विचारण्यासाठी तुमच्याकडे ते गुण अंगभूत असावे लागतात नाहीतर न विरोध करता निमुटपणे सहन करत त्याला सहिष्णुतेचे नाव देत आत्मिक समाधान मानत राहणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो.क्रिया-प्रतिक्रिया हे जरी नैसर्गिक असले तरी लोहा लोहे को काटता है अशा फिल्मी ज्ञाना बरोबरच आगीला आग नव्हे तर पाणीच थांबवू शकते हे सामान्यज्ञान असणे आवश्यक असते. तेव्हा सद्याची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता हिंसकपणा प्रचंड वाढला असुन त्याचे मुळ कारण सहनशीलतेची घसरलेली क्षमता अन् त्यामुळेच विचाराने, जीभेने सोडलेली पातळी एखादी परिस्थिती अजूनच बिघडवू शकते. कधी कधी सारखी सारखी केलेल्या बडबडीपेक्षा मौनात त्याचे उत्तर सापडू शकते. शब्दाने शब्द वाढत भांड्याला भांडं लागण्यापेक्षा मौन तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडतं. तेव्हा देशाला सहिष्णू-असहिष्णूचे लेबल लावत फिरण्यापेक्षा भौतिक विकासाच्या स्पर्धात्मक युगात वैयक्तिक पातळीवर प्रत्येकजण अस्थिर व पर्यायाने आक्रामक झालो आहोत हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे. केवळ आपापली मते मांडणे म्हणजे स्वातंत्र्य नसून समाज शांत, सुसंस्कृत असणे अधिक गरजेचे आहे. छानछोकी जीवनशैली चे आकर्षण व त्याला पोषक आजुबाजूची साधने यामुळे आपल्या DNA चा झोल झाला असल्याचे लक्षण असुन त्यामुळे आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे.
           एखादा दोष वारंवार दाखवत बसल्याने आपली प्रतिमा तुसडी होण्याची शक्यता अधिक असते. एखादी रेष पुसून कमी करण्यापेक्षा तीच्या शेजारी आणखी मोठी रेष काढून तिचा खुजेपणा दाखविता आला पाहिजे. त्याप्रमाणेच नुसते दोष काढत बसण्यापेक्षा चांगल्या योग्य गोष्टीचा अवलंब तसेच त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. त्यासाठी जी लोकं समाजासाठी काम करतात, ज्यांचा जनमानसावर प्रभाव असतो अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या वागण्या बोलण्याबाबत अधिक जागरूक असणे महत्वाचे आहे. जीभेला झालेली जखम लवकर बरी होते परंतू जीभेने केलेली जखम लवकर बरी होत नाही.शत प्रतिशत योग्य असे काही असू शकत नाही त्यामुळे काही समाजकंटक लोकं अशा परिस्थितीचा गैरफायदा घेत स्वतःचे भले करण्यात गुंतलेले असतात. मदारी ज्याप्रमाणे माकडाचा वापर करीत खेळ मांडत स्वतःचे पोट भरत असतो त्याप्रमाणेच काही मंडळी आपल्याला माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचवत स्वतःचा सत्तास्वार्थ साधत असतात.
            गरज आहे ती आपण तटस्थपणे पाहण्याची व स्वतःच स्वतःला सावरण्याची. चांगले व्यक्तिमत्व असण्यासाठी आपल्यातील चांगले अस्तित्व जपले पाहिजे." शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी "या संत तुकारामांच्या उक्ति प्रमाणे आपल्या येणाऱ्या पिढीवर योग्य संस्कार झाले पाहिजेत तरच त्यांच्या DNAतील झोल दुरूस्त होईल व त्यामुळे डोक्यातील केमिकल लोच्या थांबून योग्य वैचारिक मानसिकता प्राप्त होऊन तीचे कृतीत रूपांतर होईल.


संदिप महामुनी
९६३७१३०२०६

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णुतेची बोंबाबोंब......!


                               असहिष्णुतेची बोंबाबोंब......!

                पुरस्कार परत करण्याची साथ आली असून तीचे जे लोण पसरते आहे ते पाहता समाजातील समाजमान्य चौकटीद्वारे सिद्ध झालेले बुद्धिमान व केवळ शासकीय गौरव किंवा पुरस्कार प्राप्त अथवा मिळवलेले मान्यवर कारण पुरस्कार प्राप्तचं पुरस्कार वापसीने निषेध नोंदवू शकतात. अगदी लेखक ते कलाकार, निवृत सैन्याधिकारी ते शास्त्रज्ञ सर्व क्षेत्रातील व्यक्ती कोणीही  त्यास अपवाद नाही. या सर्वांच्या मतानुसार सध्याच्या भारत देशामध्ये अतिशय असुरक्षित वातावरण आहे. सरकार देखिल असहिष्णुपणे वागत सर्वांची मुस्कटदाबी करीत आहे तेव्हा समाजात कमालीची अराजकता माजली असुन सरकारचा अनागोंदी कारभार चालू आहे असे चित्र प्रसार माध्यमातून दाखविले जाते आहे.
               सहिष्णुता हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. इथेच हिंदू, जैन, बौद्ध धर्माची स्थापना व प्रसार झाला. ज्याचा पाया हाच मुळात सहिष्णुतेवर अवलंबून आहे.  इंग्रजांच्या जुलमी राजवटी नंतर मिळालेल्या स्वातंत्र्यात आपण धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाहीचा स्वीकार केला तेंव्हापासून आजपर्यंत अनेक दुर्दैवी घटना घडल्या अगदी फाळणीच्या दंगलीपासून ते बाबरी मस्जिद पाडण्यापर्यंत,काश्मीर पंडितांवरील अन्यायांपासून लादलेल्या आणीबाणीपर्यंत,खलिस्तान ते इंदिरा गांधीच्या हत्येनंतर झालेल्या शिखांच्या शिरकाणापर्यंत,अगदी दलितांवर झालेले अनेक हल्ले महाराष्ट्रातील खैरलांजी ते बिहार मधील घटनेपर्यंत.दाभोळकर,पानसरे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांपासून कलबुर्गींसारख्या लेखकांपर्यंत अनेकांच्या झालेल्या हत्या तसेच ज्या घटनेमुळे पुरस्कार वापसी सुरू झाली ते गोमांस बंदी ते दादरी अशा सर्वच घटना या निषेधार्यच आहेत त्याबद्दल विवेकवादी विचार करणाऱ्यांच्या मनात कोणतीही शंका नाही.
एवढ्या अफाट लोकसंख्येमधे वेगवेगळ्या जाती-धर्माची,विचारधारेची लोकं इथे राहत असताना आपापल्या जाती-धर्माचे, विचारधारेचे समुह तयार होत आहेत. ते करीत असताना आधुनिक सोशल मीडिया आपल्या हाताशी आहेच. तेव्हा असे गट तट तयार होणे स्वाभाविकच आहे अन् त्याचे उपद्रव मुल्य देखिल लक्षवेधी असते. पन्नास, शंभर जणांनी नुसता रस्त्यावर गोंधळ घातला तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.गुजरातेतील पटेल अंदोलनावेळी असा प्रत्यय आला आहेच. तेव्हा घडणाऱ्या घटनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या अत्यल्प असले तरी २४ तास बातम्यांचे रतिब घालणाऱ्या वाहिन्या तसेच अनिर्बंध सोशल मीडियामुळे याची व्याप्ती अनेक पटीने वाढते आहे. वारंवार केलेल्या अधोरेखितपणा मुळे ती बातमी ठळकपणे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबली जाते व सामान्य विचार तशाप्रकारेच व्यापला जातो.
              विद्यमान सरकार मधील सत्ताधारी पक्ष हा मुख्यतः विशिष्ट धर्माच्या विचाराने प्रभावित आहे परंतू ते ज्या परिस्थितीत म्हणजे जनता घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई ने त्रस्त असताना ज्या विकास या मुद्यावर निवडून आले परंतू नेमके तेच विकासाचे चित्र विद्यमान सरकारच्या कार्यशैलीतून परावर्तित होत नसून त्यांच्या मुळ विचारधारेविषयी आक्रामक व राजरोसपणे सरकार मधील लोकप्रतिनिधीच बेताल वक्तव्य करीत असतील व सरकारचे प्रमुखच सोयिस्कर मौन बाळगत असतील तर संपूर्ण सरकारची प्रतिमा मलीन होणार हे देखिल स्वाभाविक आहे. त्यातून राजकारणाला कोणत्याही मुद्याचे वावडे नसल्याने त्याचा सत्ताप्राप्तीसाठी घेतला जाणारा फायदा अनिवार्य आहे. तसेच विद्यमान सरकारनेच सत्ता मिळविताना एखाद्या घटनेचा वा विषयाचा भडिमार करून बेजार करण्याची योजलेली युक्ती व तिची नेटकी प्रसिद्धी यंत्रणा सध्याचे विरोधी पक्ष अवलंबित आहेत. तेव्हा एखादे खोटे शंभरवेळा छातीठोकपणे उगाळले तर ते लोकांना खरे वाटू शकते कारण सध्याच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक जगात दुसऱ्याचा विचार करायला व शहानिशा करायला कुणाला वेळच नाहिये, जो तो आपापल्या भौतिक विकासात गुरफटलेला आहे.तस पाहिलं तर त्यामुळेच प्रत्येकजण एक दुसऱ्याशी असहिष्णुपणे वागतो आहे अन् असहिष्णुतेची भाषा करणारे कलाकार स्वतःच्या अहंकाराने नियम पाळताना एखाद्या सुरक्षा रक्षकाशी किती सहिष्णूपणे वागतात तसेच घरापुढे अनाधिकृत रँप बांधून रहदारीला कसा अडथळा करतात हे आपण पाहिले आहेच.व्यापक देशहितासाठी कोणत्या मुद्या भोवती राजकारण केले पाहिजे याचे नैतिक भान सत्ताधारी व विरोधी या दोन्ही पक्षांना असले पाहिजे केवळ आपल्याकडील नेतृत्व गुण व वकिली बुद्धी आपापल्या राजकीय फायद्यासाठी खर्च करीत असतील तर देश दिवाळखोरीत निघायला वेळ लागणार नाही.
जगाचा ईतिहास आपण पाहिला तरी आपापला समुह करणे अन् त्याला विशिष्ट चौकटीत बसवणे, तसेच इतर समुहांवर आक्रमण करणे किंवा आक्रमणला प्रत्युत्तर देणे हे सर्व मानवी जनुकीय वृत्तित आहे.परंतु वैचारिक संस्कारामुळेच आपल्या पेक्षा वेगवेगळ्या आचार, विचारधारांशी सामावून घेणे शक्य आहे. त्यातूनच सहिष्णुता निर्माण होऊ शकते. परंतू ते करीत असताना आजुबाजूचे वातावरण त्याला पोषक पाहिजे जर गोष्टीतील सश्याप्रमाणे पान पडलं म्हणून आभाळ कोसळलं अस समजून बोंबाबोंब केली व त्यातून भिती अन् संशयाचे वातावरण निर्माण झाले तर आधीच अस्थिर समाज जास्तच बिथरेल व त्यातील समाजकंटक टोकाची पाऊले उचलतील त्यातून केवळ अराजकताच माजेल. तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी आपली प्रतिमा हा तर अजूनच गंभीर प्रश्न आहे.
देशातील प्रत्येकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे तेव्हा देशातील प्रतिभावान, बुद्धिजीवी मंडळींनी संयम दाखवत आपल्या लिखाण, कला, प्रबोधन अशा अनेक माध्यमातून समाजातील व सत्ताधाऱ्यांच्या धोरणातील वैचारिक त्रुटी दाखवल्या पाहिजेत अन् देशाच्या सांस्कृतिक विचारधारेला योग्य दिशेला नेले पाहिजे. केवळ प्रतिकात्मक कृती करून प्रसिद्धी मिळवत राहिली तर जनता रोजचं मडं त्याला कोण रडं याप्रकारे घेतील व त्यातील महत्वाचा गाभा दूर राहिल.केवळ असहिष्णुता असहिष्णुता अशी बोंबाबोंब न करता सहिष्णुपणे त्यातून मार्ग काढला पाहिजे.

चला नैतिक विचारांच्या प्रकाशाने दिपावली उजळून टाकूया !

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

शनिवार, १० ऑक्टोबर, २०१५

दादरी ते युनो व्हाया .....' अकलाख '

   
                          दादरी ते युनो व्हाया .....' अकलाख '

                       उत्तरप्रदेशातील 'दादरी' या गावात 'मोहम्मद अकलाख' यांचा घरामधे गोमांसाचा साठा करतात व ते खातात या अफवेवर विसंबून संतप्त जमावाने खून केला अन् धर्मनिरपेक्ष लोकशाहीला गालबोट लागले. मानवाचा आहार हा नेहमीच त्या त्या भौगोलिक वातावरणाला उपयुक्त तसेच त्याची उपलब्धता यावर अवलंबून असतो. अर्थात दळणवळणाची सोय झाल्यामुळे कुठलाही पदार्थ कोणत्याही ऋतुत कुठेही उपलब्ध होत असला तरी नैसर्गिकपणे जे मिळते त्यावर बहुसंख्यकांची भिस्त असते. पुर्वीपासून समुहानी राहत असलेला मनुष्य हा त्या त्या आहाराला महत्व देत त्याचा समावेश त्यांच्या विशिष्ट चालीरीती व परंपरांशी निगडित ठेवू लागला. मग त्यातूनच पुढे खाण्यापिण्यावरून जाती-धर्माचे वर्गीकरण होऊ लागले. ढोबळमानाने शाकाहार, मांसाहार तसेच मिश्र आहार असे देखिल विभागणी आपण करू शकतो. त्यात शाकाहार श्रेष्ठ, मांसाहार निषिद्ध असे जे मांडले जाते तो देखिल गैरसमज आहे. त्याला देखिल भुगोल व उपलब्धता याची किनार असते. सर्वजण शाकाहारी झाले तर त्यांच्यासाठी लागणारे अन्नधान्य,भाजीपाल्याचा पुरवठा शेतकरी करू शकतो का? आधीच निसर्गाचा लहरीपणा व त्यामुळे उद्भवणाऱ्या त्याच्या कहरतेचा अनुभव पाहता ते अशक्य आहे त्यात भर म्हणून अती किटकनाशकांचा वापर तसेच भेसळीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा होय. अन् जर मांसभक्षणासाठी वापरणारे प्राणी तसेच भाकड जनावरांची संख्या बेसुमार वाढली तसेच त्यांच्या चारापाणीची कमतरता यामुळे असमतोल निर्माण होईल त्याच काय.
                      मनुष्य ज्या धर्मात, संस्कृतीत जन्म घेतो वाढतो त्यामुळे त्याच्या सुप्त मेंदूवर ते ठसले जाते, हे जरी नैसर्गिक असले तरी अनेक वर्षांच्या स्थित्यंतरानंतर शिक्षित झालेल्या मनुष्याला इतर जणांचे सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीत खाणे, पिणे, राहणे असु शकते तसेच नानाविध जात धर्म असलेल्या ठिकाणी त्यांचे त्यांचे स्वातंत्र्य हक्क अबाधित राखणे हे अपेक्षित आहे. हिंदू धर्मात गाय या प्राण्याला मातेचा दर्जा दिला आहे.तसेच वर्षोंवर्षांच्या संस्कारांमुळे तो भावनेशी निगडीत प्रश्न बनला आहे तसेच मुस्लिम धर्मामधे डुक्कर हा प्राणी निषिद्ध मानला जातो.त्यामुळेच भावनेला भडकावण्यासाठी ह्याचा चपखल वापर इंग्रजांच्या १८५७ च्या बंडानंतर निदर्शनास आला आणि संघटित शक्तिचा धोका ओळखत त्यानंतर आपल्या देशावर राज्य करताना 'फोडा अन् राज्य करा ' हे धोरण राबवित दंगली घडवून व देश सोडून जाताना भारत-पाकिस्तान अशी फाळणी करून आपल्याला स्वातंत्र्याबरोबरच धर्म द्वेषाची ठसठसणारी जखम सुद्धा दिली. दुर्दैव म्हणजे आपल्या देशातील राजकारण्यांनी त्याचा गैरवापर करीत इंग्रजांचाच कित्ता गिरवला व जात धर्मांच्या विषयांवर आज देखिल त्यांचा तोच उद्योग चालू आहे. आपण कितीही शिक्षित झालो तरी समस्यांचे मुळ समजून घ्यायच्या ज्ञानाचा अभाव आपली कुत्तरओढ करतो आहे. नुकतेच महाराष्ट्रात काँग्रेसने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध म्हणून बैलगाडी अंदोलन केले तेव्हा बैलगाडीत चक्क १५ते१६ नेते मंडळी बसली होती.अन् त्यांच्या ओझ्याने बैलं पुरती बेजार झाली होती. ते पाहता ही नेते मंडळी एखादे प्रतिकात्मक अंदोलन करताना पशूंच्या आरोग्यापेक्षा स्वत: च्या चमकोगिरीला अधिक महत्व देतात परत हीच मंडळी पशुधनाच्या बाता टिव्ही समोर करीत राहतात. त्यामुळे जनता ही रूग्णवाहिकेतील अत्यवस्थ पेशंट सारखी असुन तिला लवकरात लवकर उपचारार्थ पोहचवण्या ऐवजी त्यालाच वाऱ्यावर ठेवित रूग्णवाहिकेच्या ड्रायव्हर व रूग्णाच्या नातेवाईकांनी आपल्या पोटाचाच विचार करीत ढाब्यावर ताव मारणाऱ्या कर्तव्यशुन्य वृत्तीचेच हे नेते पाईक बनलेत ही शोकांतिका आहे.
                      वरील घटनेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दोन्ही बाजूने येत असताना आझम खान या मुखंड नेत्याने मुस्लिमतेचा वापर करीत देशातील मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय बाबत तसेच आर. एस. एस. चा हिंदू राष्ट्र बनवण्याकडे असलेला कल व त्या विचारांचेच विद्यमान सरकार या आशयाचे पत्र युनोला लिहण्याचे पत्रकार परिषदेत अभिमानाने सांगितले. परंतु यातून देशाच्या इभ्रतीचा आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर पंचनामा करून सगळेच मुसळ केरात घालण्याचा उपटसुंभपणा त्यांनी केला आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर मधील अपक्ष विधायक शेख अब्दुल रशीद यांनी विधानभवन परिसरातच गोमांस पार्टी ठेवली त्याचा परिणाम विधानसभेत गोमांस बंदी साठीचे विधेयक मांडताना हाणामारीत झाले. मुस्लिम लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे कुठलेही समर्थन होऊ शकत नाही तसेच केंद्रातील सरकार हे आपलेच असल्याचा उद्दामपणा करत कोणत्याही उजव्या संस्थानी धुमाकूळ घालणे हे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला धोक्याचे आहे. विशेष म्हणजे ज्या विकास या मुद्यावर सध्याचे सरकार निवडून आले त्याचे प्रमुख पंतप्रधान हे सोयीस्कर मौन बाळगत आहेत हे अधिकच धोकादायक आहे. मन की बातच्या माध्यमातून एकतर्फी स्वतःला हवा तो विषय लोकांना सांगून जनतेशी खऱ्या अर्थाने संवाद साधू शकत नाही. या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांच्या मनात नेमके काय आहे हे देखिल आपल्याला कळले पाहिजे. न बोलणे म्हणजे मुकसंमती हाच अर्थ त्यातून स्वाभाविकपणे निघेल. अन् पंतप्रधानांनी या महत्वपूर्ण मुद्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे येणाऱ्या संकटाला देखिल सर्वस्वी तेच जबाबदार असतील.
                   आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा ही इतर देशांना उपयुक्त अशी बाजरपेठ व त्यास अनुकूल वातावरण अशी करीत फिरणारे पंतप्रधान यांनी जेव्हा युनो मधे भाषण केले तेव्हा त्यांनी आतंकवाद या विषयावर जोर देत सगळ्या देशांनी त्या विरोधात एकत्र येऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे या आशयाचे भाषण केले परंतू जर आपल्याच देशात उभी फुट पडण्यासारखी परिस्थिती व त्यास अनुकूल वातावरण दिसत असताना तसेच ती फुट पाडण्यासाठी त्यांचेच समर्थक अग्रभागी असतील तसेच अकलाख च्या निमित्ताने दादरी सारखा विषयात पंतप्रधानांनी बाळगलेले मौन त्याच युनोमधे त्यांचा दुतोंडीपणा जगासमोर उघड करेल.संयमासाठी अनुसरलेले मौन संयुक्तीक असते परंतू देशाच्या उज्वल भविष्याला खोडा घालणाऱ्या संवेदनशील प्रसंगात तेच मौन हे उपरोधिक ठरू शकते.तेव्हा दादरी ते युनो व्हाया अकलाख ह्या प्रवासाचे गांभिर्य वेळीच ओळखून पंतप्रधानांनी ते त्यांच्या बोलण्यातून व कृतीतून दाखवावे अशीच प्रत्येक धर्मनिरपेक्ष देशप्रेमी व्यक्तींची माफक अपेक्षा आहे !

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

अवघड जागेचं दुखणं ......


           अवघड जागेचं दुखणं ........

           काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश या राज्यात सचिवालयातील शिपाई या पदासाठी,३६८ जागां करिता अर्ज मागवले होते त्यासाठी तब्बल २३लाख अर्ज दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे २५५ अर्ज पिएचडी धारकांचे होते अन् जवळजवळ २लाख अर्ज इंजीनियर, एमएससी,एमकॉम अशा पदवीधरांचे होते. पद निवडीसाठी थेट मुलाखत पर्याय ठेवल्यामुळे या भरती प्रक्रियेला किमान ४वर्ष लागतील असा अंदाज व्यक्त करत राज्यशासनाने ती प्रक्रियाच रद्द करून टाकली. राजकीय नेतृत्वाने सोपा मार्ग स्विकारत हात झटकले परंतु यातून निदर्शनास आलेली  बेरोजगारीची भिषणता ही कोणत्याही जागरूक शासनकर्त्याची झोप उडवण्यास पुरेशी आहे. जगातील सर्वात तरूण, तसेच महासत्ता बनण्यासाठी आशावादी असणाऱ्या भारत देशाची भिस्त अशाप्रकारच्या बेरोजगार तरूणांवर असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला मुखभंगच होणार याबाबत माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही.
         आपल्या लोकशाही व्यवस्थेत प्रशासन(?) व लोकनियुक्त (?) सरकार या दोघांनीही समन्वयाने राज्यकारभार चालवायचा असतो. मात्र एकिकडे प्रशासनातील अर्निबंध खाबुगिरी व त्यामुळेच र्निमाण झालेली शिथिलता अन् त्यातूनच आलेला धोरणं राबवण्याबाबतचा सुस्तपणा तर दुसरीकडे लोकशाही पद्धतीनेच लोकतंत्राची येथेच्छ मोडतोड करीत साम दाम दंड भेद नितीशास्रानुसार लोकांचा वापर करीत केवळ सत्ताकेंद्रें हस्तगत करून प्रस्थापित बनणारा स्वतंत्र भारतातील नवा मांडलिक असणारा राजकीय वर्ग,तसेच या दोन्हीच्या सापटीत अडकलेली जनता असे निराशाजनक चित्र आदर्श शासन प्रक्रियेला छेद देत आहे.
         बेरोजगारीच्या मुळाशी जायचं झाल्यास साधनसंपत्तीची उपलब्धता व त्या तुलनेत असणारी व अनियंत्रित वाढणारी बेसुमार लोकसंख्या. तसेच त्यांचा केवळ भौतिक विकास होण्या करिता असणारी अभ्यासक्रमापासून सोयीसुविधेपर्यंत ची बकाल शिक्षण व्यवस्था म्हणजे भरमसाठ शिक्षित तरूण बाहेर पडणारे कारखाने असुन त्यातून केवळ शिक्षणसम्राटांचेच भले होते. असो. तसेच ज्याप्रमाणात विद्यार्थी बाहेर पडतात त्याप्रमाणात त्यांना सामावून घेण्यासाठी उपलब्ध नसणारी रोजगार संधी, त्यासाठी दुरदृष्टीचा अभाव असणारे नेतृत्व तसेच रोजगार, व्यवसाय निर्मितीस प्रतिकूल असलेले वातावरण या बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ही झाली बेरोजगारपणाची कारणमीमांसा परंतु या बेरोजगारपणामुळे होतकरू तरूणांवर होणारे मानसिक, शारीरिक परिणाम अजूनच भयावह आहेत. आजुबाजूची आधुनिकता व त्यातून दिसणारे भौतिकदृष्ट्या उच्च राहणीमान,या सर्वांचे भुरळ पडणारे वय परंतु बेरोजगारीमुळे ह्या सुखसुविधेपासून वंचित राहणे त्यांना नैराश्यावस्थेस नेते.यामुळे उमद्या वयात लग्नाच्या बाजारात मिळणारी नकारघंटा पर्यायाने शरिरसुखाच्या गरजेपासून देखिल त्यांना वंचित ठेवते. अशा अभावात्मक जगण्यामुळे आपसुकच मनोरूग्णतेकडे झुकलेले अथवा गुन्हेगारीकडे वळलेल्या तरूणांची संख्या देखिल झपाट्याने वाढत आहे.
          केवळ वयाने तरूण असलेला परंतु उमेद हरवून दिशाहीन भरकटलेला नवा वर्ग,स्वप्नरंजन करणाऱ्या माध्यमात रममाण होत वास्तवात अराजक अवस्थेचा पाया बनत आहे. सळसळतं रक्त हे दुधारी शस्त्र असुन जर त्याचे योग्य उपाययोजन केले नाही तर त्याचे रूपांतर विध्वंसक लाव्हारसात होईल व त्यातून उठणारे काळ्याकुट्ट धुराचे लोट सुव्यवस्थे बरोबर भारताचे महासत्तेचे स्वप्न देखिल बेचिराख करेल.
          उत्तरप्रदेशातील वरील घटना ही अगामी काळा करिता धोक्याचा इशारा आहे त्याकडे दुर्लक्ष करणे सुशासन व सुव्यवस्थेसाठी महागात पडेल. सद्य स्थितीला भेडसावणारे आतंकवाद, नक्षलवाद,तसेच पुन्हा एकदा शिक्षित व अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करीत जात, वर्ग,धर्म यामधे उफाळलेला द्वेष व श्रेष्ठत्वाचा वाद ही सर्व वेळीच समस्यांचे न केलेले वस्तुतः आकलन व पुरक उपाययोजनांचा अभाव यांचेच फलित आहे.तेव्हां वरवर अन् प्राथमिक अवस्थेत असलेला आजार योग्य व निग्रहपुर्वक उपाययोजना करीत नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा केवळ जागतिक स्तरावर प्रतिमा उंचावण्यात मग्न असणाऱ्यांसाठी भविष्यात ते अवघड जागेचं दुखणे होऊन धड जगाला सांगता येईना, ना त्यांच्या पंक्तीत बसता येइना अशी अवस्था करेल.


                                                                                                                                संदिप महामुनी
                                                                                                                                ९६३७१३०२०६

बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

निर्वासित कर्तव्याचा बळी.....!



Innocent lifeless body is symbol of less life remains in humanity which indicates speech of introspection by silence of death !

                                     निर्वासित कर्तव्याचा बळी.....!
युरोपियन फोटोग्राफर निलुफेर देमिर यांनी दक्षिण तुर्कीतील बोर्डम् समुद्र किनाऱ्यावर एका ३वर्ष वयाच्या ' अयलान कुर्दी ' याचा वाहून आलेल्या मृतदेहाचे छायाचित्र काढले आणि ते पाहून सर्व संवेदनशील जग सुन्न झाले." अन् माणुसकी वाहून गेली..! " हीच प्रतिक्रिया स्वाभाविकपणे उमटली. ते छायाचित्र म्हणजे सिरीयातील किंबहुना जगातील प्रत्येक निर्वासितांची जीवन जगण्यासाठीची धडपड आणि त्यासाठीची जीवाची जोखिम यांना अधोरेखित करणारी निस्तब्ध, निपचित हतबलता होय.
सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडताना दिसतो. छान चौकोनी कुटूंबात रममाण होण्यासाठी आतूर झालेले आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यावर इतर घटक देखिल परिणामकारक असतात हेच विसरून जगत असतो. अगदी कुटूंबातील इतर सदस्य, घराजवळचे शेजारी, गावं, राज्यं, देश, विश्व सर्वकाही आपल्या जगण्याला अर्थ देत परिणाम साधत असतात.आपण मात्र मी ,माझं यातच गुरफटून स्वत: चा उत्कर्ष व स्थिरता यावरच भर देत व्हाइट कॉलर झापडं लावून जीवनाचा प्रवास करीत राहतो.कोणत्यातरी युद्ध सदृश्य परिस्थितीत होरपळणाऱ्या अराजकता माजलेल्या देशातील अतिरेकी संघटना जेव्हा अस्ताव्यस्त अविचाराने फोफावत अचानक एक दिवस आपल्या उंबरठ्यावर येवून ठेपतात तेव्हा मात्र प्रतिक्रिया देण्या इतपत भान देखिल आपल्याला उरत नाही अन् एक अनामिक काळजी, चिंता चेहऱ्यावर उमटते. त्यावेळी आपल्याला अराजक देशातील नागरिकांच्या अवस्थेची प्राथमिक कल्पना येते तोपर्यंत त्या नागरिकांविषयी अनभिज्ञ, असंवेदनशील असणारे आपण अपरिहार्यपणे एकाच समुहात सामील होतो. प्रत्येकजण जोपर्यंत आपल्यावर वेळ येत नाही तोपर्यंत तटस्थ राहण्याची वृत्ती सर्वच क्षेत्रात अवलंबताना दिसून येतो.
अगदी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचे दुर्भिक्ष, शेतीची, जनावरांची झालेली अपरिमित हानी, या सर्वाला कंटाळून स्वतःचे आयुष्य संपवणारा अन्नदाता सर्वकाही राजरोसपणे घडत असताना मेट्रोपोलिटन शहरी आयुष्य आपल्याच धुंदीत एल ई डी च्या प्रकाशात झगमगत असतं तेव्हा आपल्या शेजारी आसपास घडणारं दाहक वास्तव आपल्या दिशेने हळूहळू सरकणारे चक्रीवादळ असुन ते आपल्या घरावरील छप्पर उडवत जाईल याची कल्पनाही नसते. केवळ फावल्यावेळत ड्रॉइंगरूम मधे बसून काहितरी चघळायला विषय हवा असतो तेव्हा पाऊस नाही, दुष्काळ पडणार, शेतकऱ्यांच्याकडे पैसा तर बाजारपेठ, धंदा तेजीत याविषयीपासून शेअरबाजार ते आतंकवाद या सर्व ऐकीव गोष्टींवर आपापली मते मांडून आपल्या सामान्यज्ञानाची प्रचिती देत राहतो. अशा मोघम चर्चा होत राहतात परंतु त्या समस्यांचे मुळ समजावून घेत त्याचा थेट तसेच अप्रत्यक्ष परिणाम याविषयी सखोल ज्ञान घेण्याबाबतची अनास्था आपले भविष्य खऱ्या अर्थाने अंधकारमय करित असते. स्वतःचे भविष्य केवळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी विम्यापासून गुंतवणूकीपर्यंत अनेक मार्ग चोखळणारे आपण भौतिक व राजकीय वातावरणाची अनिश्चितता सधन व्यक्तीला देखिल रस्त्यावर आणू शकते ही शक्यताच कधी गृहित धरीत नाही. पैसा हे केवळ माध्यम आहे भवतालची परिस्थिती सुद्धा अनुकूल असणे तेवढेच जरूरीचे असते हा विचार आपण मनात देखिल आणत नाही.
जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला, प्राण्याला जगण्याचा समान अधिकार असतो अन् तो असलाच पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक, शारीरिक कुवतींनुसार जगण्याचा प्रयत्न करीत असतो. काही तथाकथित नशिबवान मंडळी चांगल्या साधनसामुग्रीचा उपभोग घेत असतात तर काहीजण त्या प्रक्रियेतील फक्त माध्यम असतात. अपरिहार्यता म्हणून असणारा ह्या नाही रे वर्गाला आहे रे वर्ग विकासाच्या नावाखाली इतका गृहीत धरतो की त्याला ते खेळणं समजून त्यांचा मन मानेल त्याप्रमाणे वापर करू पाहतात अन् मानवतावादी दृष्टिकोनाचे रूपांतर गुलामवादात होते. अप्पलपोटी, स्वार्थी विचारांची परिसीमा गाठत हाच उच्च वर्ग, सामान्यवर्गाला विद्रोह करण्यासाठी उद्युक्त करीत असतो.जर त्या विद्रोहाला नैतिकतेची किनार नसेल तर ती अराजकतेची नांदीच ठरते. अराजकतेच्या या वणव्यात सामान्य, उच्च वर्गा बरोबरच सर्व भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक विचार बेचिराख होतो व शांततेचे पर्यवसन अशांततेत होते.केवळ स्वतःच्या भातावर डाळ ओढण्याच्या वृत्तीने श्रीमंत अधिक श्रीमंत होत धनदांडगे बनतात तर गरीब अधिक गरीब होत शोषित पिडीत बनत जातात. ह्या दोन्हींतील दरी अधिकच रूंदावत जाते, ही दरीच सर्व अस्थिरतेचे मुळ असुन त्याचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे.'सबका साथ सबका विकास' हेच त्यावर खरे उत्तर असू शकते परंतू घोषणेपुरता किंवा सरकारी योजनेपुरता मर्यादित याचा विचार न करता प्रत्येकाने संवेदनशीलतेने स्वतःच्या विचारधारेत हा संस्कार रूजवला पाहिजे.
दुसऱ्याची समस्या तटस्थपणे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून निर्विकारपणे शुन्यात पाहत राहिलो तर ती समस्या उद्या आपल्याकडे पोहचू शकते याची जाणीव प्रत्येक जागरूक व्यक्तिला असलीच पाहिजे. एखाद्या देशाचा नागरिक शेवटी मानवी गरजांसाठी बांधील असतो जेव्हा जगण्यासाठी आवश्यक अन्न,पाणी, निवारा या मुलभूत गरजांपैकी कशाचीही कमतरता भासू लागली की तो स्थलांतर करण्यास प्रवृत्त होतो हा उत्पत्तीपासूनचा ईतिहास आहे तसेच हा नियम सर्व प्राणीमात्रांना लागू आहे. तेव्हा त्या व्यक्तीची हतबलतेला निर्वासित म्हणून संबोधित तुच्छ वागणूक देत नाकारणे मानवतेला धरून नाही. कारण एखाद्या अतिरिक्त जबाबदारीमुळे जरी आपल्या राहणीमान तसेच नागरी व्यवस्थेवर ताण येत असला तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्या कुवतींनुसार त्यांना सामावून घेणे गरजेचे आहे.
एखाद्या जीवाचे मोल हे आपल्या सुखवस्तूपेक्षा अधिक असते. जगद्गुरू संत तुकारामांनी सांगितलेली 'हे विश्वची माझे घर' ही भावना उक्तीतून प्रगट होण्यासाठी 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' हा विचार कृतीत उतरला पाहिजे तेव्हांच 'अयलान कुर्दी' सारख्या अन्य निष्पाप भावी पिढीचा बळी जाणार नाही !

संदिप महामुनी
९६३७१३०२०६

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

'उन्मादीन' स्वातंत्र्य !

                                       'उन्मादीन' स्वातंत्र्य !

              'नेमिची येतो स्वातंत्र्यदिन' याप्रमाणे वर्ष मोजत आयुष्य ढकलणारे आपण एका परकिय देशाच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या दिवसाचे औपचारिक कोडकौतुक सोहळ्यापुरते मर्यादित झालो आहोत. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ह्याचा कधी शोध न घेता केवळ मुक्तपणा तोहि सोयीस्कर उधळत जगण्याला आपले स्वातंत्र्य समजत त्याची पाठराखण करण्यातच आपण धन्यता मानतो आहोत.प्रत्येक गोष्ट करताना काही नियम आवश्यक असतात आणि ते काय करावे व काय करू नये यास्वरूपाचे असतात. या नियमांची आवश्यकता ही ती गोष्ट व्यवस्थित पुर्णत्वाकडे नेण्याबरोबरच त्यामुळे कोणतेही वैयक्तिक अथवा सामाजिक दुष्परिणाम होऊ नयेत याकरिता गरजेची असते. आजकाल नियम न पाळणे हे भुषणावह ,कोणीतरी 'व्ही.आय. पी.' असण्याचा परवाना अशाप्रकारची मानसिकता समाजात रूजलेली आहे. नियम हे दुसऱ्याने पाळावयाचे,त्यांनी ते नाही पाळले तर ते कसे मुर्ख आहेत असे दुसऱ्याला सांगताना स्वतःच्या नियम न पाळण्याचा वृत्तीचे लंगडे समर्थन करित आजच्या जगात असेच वागावे लागते नाहीतर माणसं आपल्याला नेभळट समजतात अशी पुस्ती जोडतात.अशाप्रकारे नियमबाह्य वागण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत स्वतःचे योगदान न तपासता 'आपला देश नां,कधी सुधारणार नाहीं 'असा  कळकळीचा सुर आळवतात.
      माहिती तंत्रज्ञानाच्या जंजाळात स्वतःला अडकवून स्पर्धात्मक युगाच्या नावाखाली सर्व गोष्टींचा अगदी भावनांपासून व्यवहारापर्यंत ते विकासापासून प्रगतीपर्यंत बाजार मांडला जातोय. कुठलीही शिस्त, धरबंद न मानता, प्रचार व प्रसार या तत्वाचा वापर करीत प्रत्येकाच्या डोक्यात तो भिनत चाललाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी शेखी मिरवणारे व बहुतांशपणे गैरफायदा घेणारे पत्रकारिता माध्यम या सगळ्यावर कढ़ी करते आहे. कोणतीही बातमी सर्वात आधी आम्ही दाखवली अशी स्वस्तुती करत स्वत:चीच पाठ थोपटण्याचा अगोचरपणा व्यवसाय युक्ति म्हणत उघडपणाने केला जातो तर एखादी बातमी नैतिकतेसाठी आम्ही कशी दाखवली नाही असे वारंवार सांगून चोरट्या तात्विकतेचे प्रदर्शन देखिल मांडले जाते.
      नुकत्याच झालेल्या याकूब या बॉम्बस्फोट प्रकरणातील सिध्द गुन्हेगाराच्या फाशीचा सरकारने स्वत:च्या धोरणीपणाची पाठ थोपटत सार्वजनिकरित्या जाहिर केलेला दिवस तर समांतर न्यायालय चालवणारे स्वयंसिद्ध कायदेपंडितांपासून हिट अँण्ङ रन करणारा तारा तसेच तथाकथित सन्माननीय बुद्धिवंत चेहरे यानीं मानवतावादाच्या नावाखाली फाशीला विरोध करीत बडवलेला उर व या सर्वांच्याही एक पाऊल पुढे माईक नावाचे अस्त्र व कँमेरारूपी शस्त्र परजत एखाद्या ऐतिहासिक प्रसंगाचे इत्यंभूत सादरीकरण करण्यासाठी आतूर झालेले माध्यमवीर यांनी याकूबला फाशी देण्या अगोदर त्याने काय काय केले याची क्रमवार माहिती तो कधी उठला, त्याने आंघोळ केव्हा केली, कोणता नाष्टा केला असले फालतू व नसत्या उठाठेवी करीत त्याच्या फाशी नंतर त्याच्या नातेवाईकांचा अशा परिस्थितीत पिच्छा पुरवून त्यांचे 'बाईट्स' घेण्याचा किळसवाणा प्रकार करीत तसेच त्याच्या अंत्यविधीचा दफनभूमीतूनच थेट प्रक्षेपणाचा घातलेला घाट (सुदैवाने सरकारने वेळीच हस्तक्षेप करीत तो  थांबविला). या सर्वांचा 'तमाशा' आपल्या देशा बरोबर सर्व जगाने पाहिला. परंतु या सर्वाचे आपल्या देशावर होणाऱ्या दुष्परिणामांचा व त्या बरोबरच ईतर देश आपल्याकडे कोणत्या विचाराने पाहतात या बाबींचा गांभीर्याने विचार केला जातोय का ? जर आतंकवादी गुन्हेगाराच्या अत्यंयात्रेला गर्दी होत असेल अन् त्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागत असेल तर देशात पडणारी ही उभी फूट हे सुदृढ लोकशाही व्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे. मग केवळ असल्या उठवळ माध्यम स्वातंत्र्याच्या आपण गप्पा मारणार असु तर ते उज्ज्वल भविष्यासाठी दुर्दैवच ठरेल.
     तुम्ही कोठेही जाऊ नका बातम्यांचा ओघ असाच सुरु राहील असे अवाहन करणाऱ्या वृत्त वाहिन्या केवळ नैतिक सोपस्कर पार पाडण्यापुरत्या थोड्याफार चांगल्या बातम्या दाखवितात व ईतर वेळी २४*७ त्याच त्याच बातम्यांचा भडिमार करीत असतात. स्वतःच्या मर्यादा विसरुन, समाजाला जागृत करत दिशा देण्याऐवजी नुसत्या बातम्यांचा रतीब घालत या देशाला दिशाहीन भरकटवतायत असे मला वाटते.
      फोनपुरते स्मार्ट झालेल्यांचे एखादी अनैसर्गिक अथवा विपरीत घटना घडली की ती सावरण्यासाठी हात उठण्याऐवजी कँमेऱ्यात ती गोष्ट कैद करण्यासाठी ते उंचावतात हे दाहक वास्तव आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर कलामसरांच्या जाण्याने  श्रद्धाजंलीच्या  सहानुभूतीची लाट निर्माण करणारे त्यांच्या दूरदृष्टिचा मार्ग न स्विकारता तिथेच विरून जाणार असतील व याकूबला फाशीच्या बाजूने बोलणारा देशप्रेमी परंतु त्याविरूद्ध बोलणारा हा मात्र देशद्रोही असे विवेकशुन्य सरधोपट मार्ग स्विकारत असतील तसेच केवळ लाईक अन् फॉरवर्ड यामधील बंदिस्तपणा खऱ्या विचारांना स्वातंत्र्य देणार नसेल तर असे कितीही स्वातंत्र्यदिन खर्ची पडले तरी आपण स्वातंत्र्यदृष्ट्या प्रगल्भ होणार नाही.
      सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे स्वातंत्र्य नैतिकदृष्ट्या अबाधित राहण्याकरिता नियमांचे काटेकोर कुंपण घालत संविधानाच्या चौकटीत बसविले आहे परंतु ही कुंपणेच आता शेतं खाऊ लागली आहेत. तेव्हा अशा अतिरेकी स्वातंत्र्याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही.
     ज्याप्रमाणे एखादा गर्दुल्या खोट्या धुंद वातावरणात जगतो परंतु ती धुंदी त्याचे आयुष्य आतुन पोखरत त्याला एका निरर्थक शेवटाकडे ढकलत असते. त्याप्रमाणे असले बेलगाम स्वातंत्र्य आपल्याला नकळतपणे उताविळ बनवत मानसिक व आर्थिक दृष्ट्या कॉर्पोरेट गुलामगिरीत ढकलत आहे.
नेहमीप्रमाणे १५ अॉगस्ट निमीत्त देशप्रेमाचे भरते येईलच. स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना स्वातंत्र्याचा हा उन्माद सारासार विवेकाला निशब्द करीत त्याला खऱ्या अर्थाने दीन बनवेल. ही आशंका खोटी ठरो व लोकांना सुबुद्घी मिळो हीच स्वातंत्र्यदिनी सदिच्छा !
                   नैतिक स्वातंत्र्य चिरायु राहो !
                             
                                                                                              संदिप महामूनी 
                                                                                             ९६३७१३०२०६         

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

Fire of wings without missile man...

         On 27 July 2015,i am getting stunned by hearing the news of 'Sir APJ Abdul Kalam's departure. He is great visionary & inspirational power house for everyone who get connected directly or indirectly to him. So it's big loss of country as he always thinking about country & upgrading people from every class. He knew the strength of India which is youth's population.He awared about potential & ability of them. So during his presidential tenure he gave vision 2020.
If we look back into his life fold,right from childhood he struggled by selling newspaper & doing other small works, his family background is very simple as his father was boatman but he never loose focus from his studies. Although his family was poor but they supported him for that as his sister gave money for higher education by mortgage own Jewellery. So he always told peoples that India isn't a poor country but Indian thinking is poor. Be  poor is bane but remains poor is crime but don't misuse your poverty as a tool or take revenge against society or richness but fight against root cause of poverty. To succeed in your mission you must have single minded devotion to your goal.
From early age his desire was to become a pilot but unfortunately selection board rejects him meanwhile he joined research institute work on different projects. Once he got opportunity from Hindustan Aeronautics but at junior position, as he had desire to be a pilot he accepted it so he can touch with planes by other means. He played important role to develop Prithvi,Agni,Trishul,Aakash,Nag these different missiles so people recognized him by "missile man".He appointed as a scientific advisor to Prime minister. By successful testing of Pokhran- II in 1998, he get renowned on the international forum. In 2002 he recommended for presidential post & get honoured by attending it.In his presidential tenure he got opportunity to fly fighter plane as a co-pilot & he grabbed that to fulfill his childhood desire by deepest intensity towards it.
As a first ever apolitical President of India, he successfully completed his term. He cross the protocols to meet the people by heart to encourage them towards right path. Once  visit at Maharashtra, during his speech he spoke few Marathi lines & gave credit of it to Sharad Pawar & called him as his ex boss as the defense minister. It shows how humble & straight forward nature he had. Similarly when their is time to handover the charge of President to Mrs Pratibhatai Patil,he personally attended her & guide about president house which shows his caring &  respecting nature.
He always gives priority to humanity so breaches president's protocols ( President beyond protocol )that's why he isn't just popular president but "people's president ".
He was environment lover once he met that time's defense minister before launching of Agni missile for 3rd time after two unsuccessful efforts, DM asked him what do you want after successful launch of Agni missile then he replied we can plant one Lac trees.
He always promote corruption free India & encourage youth towards honesty & ethics. He always told that if you salute your work you needn't to salute anyone else but if you are do illegal work you have to salute everyone. He already mentioned that don't follow my mourning instead of that work for the progress of our country.
As he was belong to Muslim family he learned it's tradition from his father, understand Hindu religion from Tarktirth Laxmanshastri Joshi & by taking formal training from Christian society makes him truly secular & democratic leader having passion & vision, ready to find out solution for any problem & work with integrity.
He was multifaceted personality as he wrote poems( my journey ),books( vision 2020,ignited mind etc ),autobiography( wings of fire ).He played rudraveena, he was vegetarian.He was meticulous & prompt, always ready to learn & share it in terms of national growth, never feedback to any kind of criticism, prove oneself by deeds.
He loves to be known as a teacher so when he got offer of 2nd term as the president he denied it & choose to be mentor & motivational speaker to ignite fires in the wings of youth. He always told them have courage to think differently, courage to invent,travel the unexplored path, courage to discover impossible, conquer the problems & succeed as great dreams of great dreamers are always transcended.He told dream isn't which came by sleeping but that which never goes you to sleep. And in unfortunate coincident he collapsed during speech on 'liveable planet earth' for students of IIM, Shilong & died afterwards. Exit when you are doing what you like is sign of being energetic,enthusiastic & everlasting. His work for student to encourage & channelling their right energy is also admired by UNO & declared 15th Oct ( kalam sir's birthday ) as the "world students day "in his presence.
He always thought about nation' progress. On the last day of his life he was nervous & worried about Parliament uproar, he thought members use innovative ideas to make Parliament more productive & vibrant. He had regret that not being able to provide 24x7 electricity facility to his parents. But he always wore genial smile & his last wish was billion smiles on billion faces in the country. what makes him truly great in his acknowledgement of the simple things in life done rightly. So he is truly deserving Bharatratna awardee.
Sir as you are no more available to teach us, as your body rest in a peace but we assured you that your inspirational thoughts is always ignites fire in the wings of every Indian to make our country great by all means. We follow the path you showed in your vision.

This missile of inspiration will never laid down!

                                            Sandeep mahamuni
                                                  9637130206

गुरुवार, ३० जुलै, २०१५

मंगळवार, २३ जून, २०१५

पंगु कुटुंबाचा अपंग कुटुंबप्रमुख




अपंगत्वाचे भांडवल घेऊन जगणाऱ्याने स्वत: बरोबर सर्व कुटुंबाला मानसिक व शारीरिकदृष्ट्या पंगू बनविले आहे.

शुक्रवार, १९ जून, २०१५

वेठबिगारांच्या खांद्यावर अध्यात्मिकतेचे ओझे





By reading the spiritual books and following spiritual tradition, adopting sacrifice to avoid luxary and selecting simple life style if you are using downtrodden peoples like working machine it means your concious isnot alert then you are not able to mentor the society as a saint. 

Devine colours of prostitute's life



Celebrating Godess YELLAMMA's palanquin festival. 

Stunt for survive to balance the life.





Representing need of every individual to live the life i e BALANCE.
Age or gender doesn't matter to take responsibility of the family.