देव देव्हाऱ्यात नाही....!
महिलांचा म्हणजे तथाकथित आदिशक्तिचा शनिच्या चौथऱ्यावरील प्रवेश असो की त्र्यंबकेश्वर मंदिर गाभाऱ्यात तसेच स्त्री देवता महालक्ष्मी हिच्या मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश अथवा हाजी अली दर्ग्यातील प्रवेश असो स्त्री-पुरूष समानतेचा प्रतिकात्मक लढा देणे योग्यच.परंतू न्यायालयाने मानवीय हक्क अधोरेखित करून सुद्धा मुजोर पुरषी मानसिकतेशी तसेच व्यवस्थेशी पदोपदी लढण्यातच स्त्री तसेच अन्य दुर्बल घटकांची उर्जा नष्ट होते आहे.
मुळात स्त्री असो वा पुरूष ,'देव'ही संकल्पना सर्व प्राणीमात्रांच्या मानसिक, शाररिक मर्यादांच्या पलिकडे तसेच त्यांच्यावर नियंत्रण तसेच अंकुश ठेवणारी सर्वव्यापी आदर्श तत्वावर आधारित आहे. मनुष्याच्या मनाचा आभ्यास केल्यास प्रत्येक क्षणी अनुभवणाऱ्या घडामोडीतून मनात येणाऱ्या असंख्य सततच्या विचारांचे रूपांतर वेगवेगळ्या भावविश्वात होते त्यातूनच तो नेहमीच दोलायमान स्थितित राहतो शिवाय लहानपणापासून बिंबवलेले आपल्या मनावर म्हणजे पर्यायाने आपल्यावर देव नावाच्या बाह्य शक्तीचे नियंत्रण आहे तोच आपल्या चांगल्या-वाईट, चुक-बरोबर, पुण्य-पाप याचा हिशोब ठेवतो हा विचार व यातून येणाऱ्या हतबलते मधे देव या संकल्पनेचा तो दास बनतो.
नुकतीच केरळ मधील पुत्तिंगल देवी मंदिरातील भीषण आगीची दुर्घटना असो की नेपाळमधील भुकंपात नष्ट झालेली मंदिरे, केदारनाथ येथील दुर्घटना तसेच हज यात्रेत घडणारी चेंगराचेंगरी अशाप्रकारच्या विविध दुर्घटनेत आत्तापर्यंत लाखों लोक देवा समक्ष मरण पावलेत परंतू त्या दुर्घटना तो थांबवू शकला नाही. याचे साधेसोपे उत्तर म्हणजे या दुर्घटना मानवनिर्मित आहेत आणि यात तो हस्तक्षेप करीत नाही.तो सुद्धा संकटकाळी मनोबल वाढवणारा आशावादी ठेवणारा मानव र्निमित काल्पनिक आरसा असून ती एकप्रकारे मानसोपचार पद्धती आहे.तेव्हा नियमाला अपवाद असला तरी मानवी हितासाठी नियम पाळण्याला अपवाद राहिल्यास ते धोकादायकच असते व तशाप्रकारचेच प्रतिबिंब आरशात उमटणारचं.
परंतू देवाचे तथाकथित मालक,धर्ममार्तंड शनि हा पापग्रह आहे त्याच्या दर्शनाने स्त्रियां वर अत्याचार वाढतील ,साईबाबा देवाचा अवतार नसून त्याच्या पुजेनेच दुष्काळ पडला आहे असले बाष्कळ उपदेश करीत असतील तर उघडे डोळा बघा नीट करत एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे.
कुणी कोणावर कशी श्रद्धा ठेवावी ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असली तरी तिचा इतर व्यक्तिला उपद्रव होता कामा नये या संस्काराला प्राधान्यक्रम देणे ही खरी भारतीय संस्कृती असली पाहिजे पण जिथे दगडाला शेंदूर फासून तसेच महापुरुषांची सोयीस्कर विभागणी करीत त्यांचाच देव बनवत आमचे ते श्रेष्ठ बाकी सगळे दुय्यम ही भुमिका अखेर द्वेषच र्निमाण करते अन् संधीसाधू त्याचे आपमतलबी राजकारणच करीत असतात.
आपली विचारधारा निसर्गाशी अनुरूप असणे तसेच त्याच्याशी नैसर्गिकपणे एकरूप होणे त्यातच देव सामावलेला आहे ही श्रद्धा डोळसपणे अवलंबली पाहिजे. केवळ भिती, असुरक्षितता यातून तात्काळ मुक्त होण्यासाठी तसेच आयतेपणाचे समाधान पदरात पाडण्यासाठी धर्मस्थळी गर्दी करीत षोडशोपचार करण्यात काय हशील कारण देव देव्हाऱ्यात नाही तो आपल्या विचारधारेत आहे तिचेच आत्मपरीक्षण,चिंतन व मनन आवश्यक आहे.
संदिप महामूनी
९६३७१३०२०६