विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९
रविवार, २२ सप्टेंबर, २०१९
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
आयता घरोबा अन् राजकारणाचा खेळखंडोबा ...!

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'अतिशय गोंधळ वाढवणारी व दूरगामी गंभीर परिणाम करणारी ' असेच तीचे वर्णन योग्य ठरावे. काही वर्षांपूर्वी एखाददुसरा नेता पक्षांतर करत असे तेव्हा त्याचा दुष्परिणाम मर्यादित पण एकंदर राजकीय व्यवस्थेवर न जाणवण्या इतपत असायचा परंतू सध्याच्या सत्ताधारी पक्षाने जो नविनच फंडा आणून ज्या घाऊक पद्धतीने नेत्यांची आयात केली आहे ती पाहता विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिल का अशी शंका येते.
सैरभैर झालेले सत्तेत असलेले व नसलेले नेते एकंदर राजकीय दृष्ट्या अपरिपक्वतेचे तसेच सुस्पष्ट विचारधारेचा अभाव असल्याचे द्योतक आहेत. उठता बसता ज्या लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात त्या लोकशाहीत विरोधी पक्षच अस्तित्वात नसेल अथवा नाममात्र असेल तर ती केवळ कुडमुडी लोकशाहीच उरेल याचे भान सुज्ञ जणांना असणे आवश्यक आहे.
सत्ताधारी पक्ष साम दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षाला जेरीस आणून, बघताय काय सामील व्हा नाहीतर बघूनच घेतो अशा अर्विभावात वावरतायत अन् विरोधी पक्षातील नेते इडा पीडा टळो म्हणत कळपात सामील होतायत. सामील होणारे जर खरच प्रामाणिक असतील तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्यांच्या स्वविकासाच्या व्यवहारातच पाणी मुरत असेल तर वरकरणी जनविकासाची बोंब मारून काय फायदा अन् अशांकडून नैतिक विचारधारेची अपेक्षा ठेवून देखिल काय उपयोग सरते शेवटी उपेक्षाच हाती राहणार.
गळती लागलेली टाकी वापरून प्रवास सुरळीत पार पडेल का? अन् दुरुस्तीचा प्रयत्न करून देखिल न थांबणाऱ्या गळतीमुळे भांबावलेले गळकी टाकी प्रमुख हतबल अन् उद्विग्न होणे स्वाभाविक आहे त्यातूनच मुरब्बी व मुत्सद्दी साहेबांसारख्याचा तोल ढासळत असेल तर परिस्थिती बिकट झाली आहे असे समजावे. परंतू अशा परिस्थितीला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण केवळ साम दाम दंड भेद वापरून निवडुन येण्याची पात्रता असणारे मग ते गाव गुंड असो, खाणसम्राट असो, शिक्षणसम्राट असो की उपद्रव मुल्य असणारे विशिष्ट जाती-धर्माचे नेते असो अशांची मोळी बांधून सत्तेचा सोपान मिळवण्याची सवय लागलेल्यांना लोककल्याणकारी विचारधारेचा पाया होता का मग विचारधारेशी निष्ठावान सहकाऱ्यांची मजबूत फळी कशी घडणार.
दुसरीकडे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजणारा पक्ष 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे सोयीस्कर विसरत बकासुरासारखा खात सुटला आहे तेव्हा अशा प्रवृतीला अजिर्णतेचा आजार संभवतो. सतरंज्या उचलून वेगळ्या विचारांसाठी झटणारे व त्या पक्षाचा झेंडा घेतलेले जुने जाणते कार्यकर्ते या मेगा भरतीमुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक अन् अशा निष्ठावंताना गृहित धरून त्यांचे नेते राजकीय आखाडा तयार करीत असतील अन् बघा कोण कोणते पाटील अन् राजे आमच्या तंबूत येतात अशी शेखी मिरवत टाळ्या घेत असतील तर टाळ्या वाजवणारेच अशांना टाळा मारण्याची भाषा करतील. स्थानिक अन् स्थलांतरित हा वाद जिथे सर्व जगाला भेडसावतोय तो पक्ष पातळीवर पोचायला वेळ लागणार नाही अन् याची सुरुवात देखिल काही ठिकाणी झाली आहे. तेव्हा या पोटफुगीचा धोका स्वपक्षाला देखिल होऊ शकतो. स्थुल व कृश दोन्ही अवस्था शारीरिक दृष्ट्या अयोग्य तसेच संख्याबळाचा टोकाचा फरक हा देखील सुदृढ लोकशाहीला घातकच.
या साऱ्यात सध्या बघ्याची भूमिका घेणारे अन् उद्याचे तथाकथित मतदार राजे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणता शिक्का मारू माथी विचारत फिरणार आहेत. मग मात्र आयता घरोबा मांडणाऱ्यांनी व तशा प्रकारची खेळी खेळणाऱ्यांनी राजकारणाचा कसा खेळखंडोबा चालविला आहे हे केवळ पाहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९
HATE U to HATS OFF....
I HATE MY TEACHER
he is reason for my scars
he shouts at me
he likes it when I sweat, when I fall
when I can't even breathe
he is reason for my pain
he doesn't care for my sleep
i hate because he never gives up
because he is always right
and most of all
i hate him because
because he believe in me
more than i do in myself
THANK YOU COACH
Congratulations
world Champion 🏆
P V Sindhu
he is reason for my scars
he shouts at me
he likes it when I sweat, when I fall
when I can't even breathe
he is reason for my pain
he doesn't care for my sleep
i hate because he never gives up
because he is always right
and most of all
i hate him because
because he believe in me
more than i do in myself
THANK YOU COACH
Congratulations
world Champion 🏆
P V Sindhu
बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९
सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
नैसर्गिक समन्वय ...!
नैसर्गिक समन्वय ...!
निसर्ग अन् मानवाचा संबंध परस्पर पुरक असावा किंबहुना तो असतो परंतू आपण जेव्हा निसर्गाच्या अफाट क्षमतेला गृहीत धरतो तेव्हा येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी किती असमर्थ आहोत याची जाणीव होते.
जलमय झालेल्या अर्ध्या महाराष्ट्राने व त्यात अडकलेल्या हजारो कुटुंबे, पशू यांनी याचीच जाणीव करून दिली आहे.
कालनियमाप्रमाणे सर्व काही पुर्ववत होईल परंतू उरलेल्या काही कटू आठवणी कायम राहतील मग आता तरी आपण काही शिकणार आहोत का?
वरवर पाहता ही आपत्ती नैसर्गिक असली तरी मानवाने निसर्गाला गृहित धरून केलेला अर्निबंध हस्तक्षेप देखिल तितकाच जबाबदार आहे. काही वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी अभद्र युती करत विकासाच्या नावाखाली बिल्डर धार्जिणे धोरण राबविले जातात अन् नैसर्गिक नदी, नाले, ओढे व त्यासाठी असणारे पर्यावरण पुरक नियम धाब्यावर बसवून अनाधिकृत अतिक्रमणे उभी केली जातात. हीच बांधकामे मताच्या राजकारणाच्या सोयीसाठी नियमित देखिल होतात. शासन अजून पोहचलेले नाही, लोकप्रतिनिधी गायब आहेत अशी तक्रार करणारे पूरग्रस्त अशावेळेस सोयीस्कर मौन बाळगतात. खरतरं लोकप्रतिनिधींना तसेच प्रशासनाला प्रश्न विचारण्याची तीच योग्य वेळ असते. आजार होण्यापुर्वीच जर काळजी घेतली तर होणारी हानी आपण टाळू शकतो परंतू अशा धोरणात्मक वागण्याला आपल्याकडे नेभळटपणाचं लक्षण समजले जाते. मात्र जेव्हा महापूरा सारखी गंभीर परिस्थिती उद्भवल्या नंतर आपल्यातल्या माणुसकीला जास्तच पाझर फुटतो अन् अशा घटनेचे भावनिक अनुषंगाने अवलोकन सुरू होते अगदी या प्रतिकूल परिस्थितीत देखिल आमचा प्रतिनिधी कसा सर्वात आधी पोहचला याची वारंवार उजळणी करत प्रसारमाध्यमे आपले इति कर्तव्य पार पाडतात. नैसर्गिक मानसिकते नुसार संकटसमयी लोक एकत्र येतात मदतीचा हात देतात ते योग्यच परंतू अशावेळेस इंधनावर दुष्काळ अथवा तत्सम आपदे करिता लावण्यात येणारा अतिरिक्त कर जेव्हा शासन गोळा करत असते अन् रोजच्या इंधनाची खपत बघता तो आकडा किती मोठा असेल याची आपल्याला सहज कल्पना येईल तेव्हा त्या रकमेचा विनियोग सरकारने करीत त्याचा तपशील पारदर्शकपणे जाहीर केला पाहिजे अन् आपण देखील तो जाणून घेतला पाहिजे.
एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, पोलीस, स्थानिक प्रशासन आपापले कर्तव्य व्यवस्थित पार पाडतात परंतू त्यांच्यावर ही वेळ कमीत कमी यावी यासाठी नैसर्गिक संपत्तीचे म्हणजे नदी, नाले, ओढे, जंगल यांचे व्यवस्थापन, नदीतील पाणी पातळीच्या निळी/तांबडी रेषांचा संख्याशास्त्रीय अभ्यास, राज्याराज्यातील धरण धोरण यावर समंजसपणे तसेच आग्रही भूमिका घेतली पाहिजे. खरतरं लोक व लोकप्रतिनिधी यांच्यातील ध्येय-धोरण संबधीत नैसर्गिक समन्वय असणे हेच खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे.
संदीप महामुनी.

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९
रविवार, ४ ऑगस्ट, २०१९
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
सोमवार, २९ जुलै, २०१९
गुरुवार, २५ जुलै, २०१९
मंगळवार, २३ जुलै, २०१९
सोमवार, २२ जुलै, २०१९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)