विचार करण्याची उपजत देणगी निसर्गाने थोड्याफार प्रमाणात सर्व प्राणीमात्रांना दिली आहे मात्र ते व्यक्त करण्याचे कौशल्य फक्त मानवालाच लाभले आहे त्यातल्या त्यात संवेदनशील व्यक्तींना अधिक. त्याचा सदुपयोग करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०
जय जिजाऊ जय शिवराय...!
कर्तृत्व असाधारण असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर पुतळ्यांचे देखील महत्व वाढते पण असामान्यपण समजायला जीवंतपणीचा संघर्ष महत्वाचा असतो. जन्म सार्थकी लागला म्हणजे काय हे महारांजाचे चरित्र अन् चारित्र्य अधोरेखित करते. ज्यांच्या एकाच आयुष्यातील दैदिप्यमान कामगिरीचा नुसता विचार जरी केला तरी दमल्या सारख होतं पण त्यांनी ते प्रत्यक्षात केलंय ही गोष्टच अचंबित अन् तेव्हढीच प्रेरीत करते. दुरदृष्टी,लढवय्या अन् निस्वार्थी शासक अश्या वृत्तीचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेला मानाचा मुजरा...!
जय जिजाऊ जय शिवराय...!
जय जिजाऊ जय शिवराय...!
बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०
मंगळवार, २८ जानेवारी, २०२०
शनिवार, २५ जानेवारी, २०२०
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!
महाराष्ट्र केसरी पैलवानाचे किर्तन.....!
संस्काराची परिभाषा नेमकी काय असते हे तुमच्याकडे असणाऱ्या शिदोरीवर अवलंबून असते. जर का ती शिदोरी सुसंस्काराची असेल तरच तो संस्कार झळाळून निघतो अन्यथा तो झोकाळून जातो.
दोन वेगवेगळ्या बातम्या वाचताना त्याचा आज प्रत्यय आला एक म्हणजे वारकरी संप्रदायातील एका मठाधिपतीने मारूतीबुवा कऱ्हाडकर मठाचा अध्यक्ष मीच या स्वार्थ बुद्धीने व अहंकाराने त्यानी विश्वस्तांनी ठराव करून मठाधिपती म्हणून निवडलेल्या व्यक्तीचा ठरवून चाकूने हल्ला करीत पंढरीनगरीतच खून केला विशेष म्हणजे सहकाऱ्याच्या डोक्यात विणा घातल्याच्या गुन्ह्यासाठी त्याने तीन महिन्याची तुरुंगाची हवा देखिल खाल्ली होती तसेच दोघांचे गुरु एकच असलेले बंड्यातात्या कऱ्हाडकर यांना देखील मारण्याचे त्याने ठरवले होते पण सुदैवाने ते बचावले अन् दुसरी म्हणजे महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत विजेत्या कुस्तीपटूने ( हर्षवर्धन सदगीर ) उपविजेत्या ठरलेल्या व आपला मित्र असलेल्या कुस्तीपटूला ( शैलेश शेळके ) खांद्यावर घेऊन मैदानाला फेरी मारली तसेच दोघेही एकाच गुरुचे चेले असल्याने शेवटी विजय गुरुचाच झाला ही प्रामाणिक भावना दोघांचीही होती.
तस पाहिल तर महाराष्ट्रीय संस्कृती मधे वारकरी अन् कुस्ती दोन्हीही अस्मितेचे प्रतिक आहेत. वारकरी संप्रदाय म्हटलं की अध्यात्मिक मार्गाने व संत परंपरेच्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोर पालन करीत सामान्य जनांना उपदेश करीत समाज सुसंस्कृत घडवण्यासाठी आग्रही असणे होय तर कुस्ती म्हणजे शारीरिक ताकदी बरोबर चपळता असणारा रांगड्या गड्याचे मैदानी कौशल्य दाखवण्याची क्रिडा स्पर्धा होय.
इथे मात्र ज्याने समाजाला दिशा दाखवायची त्यानेच दिशाहीन होत अध्यात्मिक तत्वज्ञानाशी फारकत घेत वारकरी संप्रदायाची 'वरुन किर्तन अन् आतुन तमाशा' अशी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली. तर जिथे इर्षा, अहंकार, आक्रमकता निर्माण होण्याची संभावना अधिक तिथे संयम व नम्रता याचे प्रदर्शन दिसले. याचाच अर्थ तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो त्यापेक्षा तुमची जडणघडण कोणत्या संस्कारातून झाली आहे हेच समाजाला अधिक प्रबोधनात्मक असते.

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९
बुधवार, ४ डिसेंबर, २०१९
Live बलात्कार ...
आजकाल पुन्हा एकदा सामुहिक बलात्कार अन् निर्घृण हत्या याने देश ढवळून निघाला आहे.तसं तर रोजच कुठे ना कुठे अत्याचार घडतच असतात पण एखाद्या घटनेची बातमी सर्व माध्यमे व्यापून टाकतात मग वृत्तवाहिन्यांवर सविस्तर घटनाक्रम दाखवत ढासळलेल्या कायदा व्यवस्थेची चर्चा, निदर्शने, मेणबत्त्या फेऱ्या पुन्हा नविन घटना घडेपर्यंत काही दिवस चालू राहतात.
मला आठवतय साधारण वीस वर्षांपूर्वी गणेश उत्सव साजरा करताना जीवंत देखावा सादर करण्याची प्रथा होती त्यात एका मंडळाने live बलात्कार अशा नावाने देखावा सादर केला होता नेहमी प्रमाणे आकर्षण व उत्सुकता ताणली गेल्याने ते बघायला स्त्री-पुरूषांनी तोबा गर्दी केली होती.पोरकट वयात असल्याने मी पण रीतसर रांगेतून आत गेल्यावर पाहतोय तर मोठ्या काचेच्या बलात कार ठेवली होती अन् सगळे आशाळभूत नजरेने एकमेकांकडे पाहात स्वतःच्या मुर्खपणाला हसत बाहेर पडत होते.त्या प्रसंगाचा तेव्हा काही विचार केला नाही परंतू आज अस वाटतं दाखवणारे व बघणारे अशा दोन्ही घटकांतून बनलेला समाज त्यावेळी अन् आत्ताही बलात्कार या विषयी गांभीर्याने विचार करण्यापेक्षा उत्सुकता अथवा विनोदबुद्धीने घेतो यातच आपली सामाजिक मानसिकता अधोरेखित होते.
अगदी हैद्राबादच्या घटनेनंतरही त्याहून भयंकर घटना घडलीय त्यात चार मद्यधुंद माणसांनी रस्त्यावरच्या भटक्या कुत्रीला पकडून तीचे पाय अन् तोंड बांधून सामुहिक बलात्कार केला व नंतर काठीने बेदम मारहाण केली हा सर्व प्रकार एका रिक्षाचालकाने पाहिला अन् अती झाल्याने आरडाओरडा केला त्यामुळे ते चौघे फरार झाले.अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या या प्रसंगाने मन सुन्न झाले मग या विकृतीला काय म्हणणार कोणती मोजपट्टी घेऊन फरक शोधणार.महाराष्ट्र स्वतः जातीभेदाच्या सामुहिक अत्याचाराचे खैरलांजी ते मराठी आरक्षणाची ठिणगी पेटलेल्या कोपर्डी पर्यंत अनेक प्रसंगाचा साक्षीदार आहे.मात्र बलात्कार प्रवृत्ती थांबलेल्या नाहीत अन् दुर्दैवाने थांबणार देखिल नाहीत.कारण ज्या भौतिक परिस्थितीत मनुष्य वाढतो त्यात पुरषी अहंकार अन् बळाचा वापर करणे तसेच स्त्रीला शोभेची बाहुली व वासना शमवण्यासाठीचे साधन समजणे हेच संस्कार लादले जातात मग चित्रपट असो की जाहिरात आपण मात्र बाई वाड्यावर या अशा थुकरट विनोदावर यथेच्छ हासतो अन् अंगविक्षेप करत नाचतो देखील.
मुलींनी खासकरून शहरातील स्वातंत्र्याचा गैर अर्थ काढत अती आत्मविश्वासाने वावरणे योग्य नाही.अवेळी अन् अनोळखी अथवा जोखमीच्या ठिकाणी योग्यती काळजी घ्यावी.मला नागपूर येथे घडलेला एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो तो म्हणजे एक महिला जी स्वतः कर्नल होती अन् स्वतःच्या नवरा व मूलासोबत प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांची गाडी अडवत नवऱ्याला व मुलाला मारहाण करून तीच्यावर अत्याचार केले नंतर तीने न केलेल्या चुकीसाठी केवळ न्यायालयातच नव्हे तर आप्तस्वकीयांशी देखील लढा द्यायला लागला.यातून समाज मानसिक दृष्ट्या परिपक्व व व्यवस्था आग्रही नाही हेच स्पष्ट होते.
जोपर्यंत बलात्कार होण्याला कारणीभूत घटकांचा तसेच सार्वजनिक मानसिकतेचा सर्वसमावेशक व गांभीर्यपूर्वक विचार केला जात नाही तोपर्यंत बलात्कार live (जीवंत)... च राहणार.
सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१९
सत्तेचे शैय्यासोबती....
सत्तेचे शैय्यासोबती....
महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक, त्यातील लागलेले निकाल अन् त्यातून तथाकथित स्थिर सरकार स्थापनेसाठी गेला महिनाभर चाललेले दावे-प्रतीदावे, राष्ट्रपती राजवट ते रामप्रहरीचे शपथग्रहण हे केवळ धक्कादायकच नव्हे तर उबग येऊन व्यवस्थेबद्दलची विश्वासार्हता गमावणारा घटनाक्रम आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी तसेच दिशादर्शक विचारधारा असणाऱ्या महापुरुषांचा वारसा सांगणार्या राज्यात सत्तेसाठी जो आट्यापाट्या चा खेळ खेळण्यासाठी जीवाचा आटापिटा चालू आहे तो पाहता कोणतेही तत्व अन् त्यातून निर्माण झालेली विचारधारा याला कसलीही किंमत राहिलेली नाही मग कोणीही कुठल्याही पक्षात असो.काल आपण कोणत्या पक्षात होतो आज कुठल्या पक्षात आहे काल कुणासाठी घशाला कोरड पडे पर्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकली आज कुणाच्या गळ्यात गळे घालून मिरवतोय हे सर्व संग्रहीत करण्याची अद्यावत तंत्रज्ञान असताना कशाचीही तमा न बाळगता सोयीस्कर सारीपाट मांडला जातो.कारण आज अन् आत्ता केवळ याचाच हट्ट व स्वार्थ विचारात भिनला की मग नैतिकता व दूरगामी परिणाम यासर्वाला तिलांजली दिली जाते.
या सर्वाच्या मुळाशी ज्या समाजातून हे नेते तयार होतात तो समाज अर्थात जनता आहे कारण या जनतेचा पायाच भुसभुशीत तकलादू नैतिकतेवर तसेच दांभिक आदर्शवादावर आधारित आहे अन् म्हणूनच उघड उघड थिल्लरपणा करताना या लोकनेत्यांना काडीचीही शरम वाटत नाही.कारण लोकांनाच परखड ठाम कृती पेक्षा अलंकारिक, पुस्तकी वाक्यात घोळलेले तथाकथित विवेचन अपेक्षित असते.साचेबद्ध गोलमोल बोलण्यालाच सुसंस्काराचे कोंदण लाभल्यामुळे असु दे म्हणत निर्बुद्धपणे ते स्विकारले जाते.मी निष्ठेला जागून, कुणाशीही आप-पराभाव, शत्रुभाव तसेच ममत्व न बाळगता.... अशाप्रकारे शपथ घेणारे व तथाकथित उच्च पदावर कार्यरत असणारे परंतू त्या पदास नालायक असणारे असे शपथ देणारे यातून जो शपथ नावाचा सोपस्कार केला जातो यातच सर्व दांभिकपणा अधोरेखित होतो वास्तविक शपथ नावाच्या संपुर्णपणे उत्तरदायित्व व शब्दाला जागणाऱ्या अश्या गृहितकावर अधारित संकल्पनेचेच सार्वजनिक हसे झाले आहे.
जनतेचे भले करण्याची भलामण करणाऱ्या व लोकशाही रितीरिवाजाप्रमाणे निवडून आलेल्या तथाकथित लोकप्रतिनिधींची वागणूक ही सत्तेसाठी हपापलेली आहे कारण ज्याला कुणाचे भले करायचे असेल तर सत्ता ही एक माध्यम असू शकते पण एकमेव साध्य नव्हे.परंतू सत्तेच्या माध्यमातून स्वतःचा व आपल्या आप्तस्वकीयांचा जो काही आर्थिक, राजकीय फायदा साध्य करण्यासाठी ज्याप्रमाणे आसुसलेले आहेत ते पाहता सत्तेचे प्रामाणिक भागिदार होण्यापेक्षा सत्तेचे शैय्यासोबती होण्यातच धन्यता मानणारे आहेत हिच लोकशाहीची शोकांतिका आहे.

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९
सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९
रविवार, २२ सप्टेंबर, २०१९
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
आयता घरोबा अन् राजकारणाचा खेळखंडोबा ...!

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता 'अतिशय गोंधळ वाढवणारी व दूरगामी गंभीर परिणाम करणारी ' असेच तीचे वर्णन योग्य ठरावे. काही वर्षांपूर्वी एखाददुसरा नेता पक्षांतर करत असे तेव्हा त्याचा दुष्परिणाम मर्यादित पण एकंदर राजकीय व्यवस्थेवर न जाणवण्या इतपत असायचा परंतू सध्याच्या सत्ताधारी पक्षाने जो नविनच फंडा आणून ज्या घाऊक पद्धतीने नेत्यांची आयात केली आहे ती पाहता विरोधी पक्ष नावाला सुद्धा शिल्लक राहिल का अशी शंका येते.
सैरभैर झालेले सत्तेत असलेले व नसलेले नेते एकंदर राजकीय दृष्ट्या अपरिपक्वतेचे तसेच सुस्पष्ट विचारधारेचा अभाव असल्याचे द्योतक आहेत. उठता बसता ज्या लोकशाहीच्या नावाने गळा काढत असतात त्या लोकशाहीत विरोधी पक्षच अस्तित्वात नसेल अथवा नाममात्र असेल तर ती केवळ कुडमुडी लोकशाहीच उरेल याचे भान सुज्ञ जणांना असणे आवश्यक आहे.
सत्ताधारी पक्ष साम दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षाला जेरीस आणून, बघताय काय सामील व्हा नाहीतर बघूनच घेतो अशा अर्विभावात वावरतायत अन् विरोधी पक्षातील नेते इडा पीडा टळो म्हणत कळपात सामील होतायत. सामील होणारे जर खरच प्रामाणिक असतील तर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे त्यांच्या स्वविकासाच्या व्यवहारातच पाणी मुरत असेल तर वरकरणी जनविकासाची बोंब मारून काय फायदा अन् अशांकडून नैतिक विचारधारेची अपेक्षा ठेवून देखिल काय उपयोग सरते शेवटी उपेक्षाच हाती राहणार.
गळती लागलेली टाकी वापरून प्रवास सुरळीत पार पडेल का? अन् दुरुस्तीचा प्रयत्न करून देखिल न थांबणाऱ्या गळतीमुळे भांबावलेले गळकी टाकी प्रमुख हतबल अन् उद्विग्न होणे स्वाभाविक आहे त्यातूनच मुरब्बी व मुत्सद्दी साहेबांसारख्याचा तोल ढासळत असेल तर परिस्थिती बिकट झाली आहे असे समजावे. परंतू अशा परिस्थितीला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण केवळ साम दाम दंड भेद वापरून निवडुन येण्याची पात्रता असणारे मग ते गाव गुंड असो, खाणसम्राट असो, शिक्षणसम्राट असो की उपद्रव मुल्य असणारे विशिष्ट जाती-धर्माचे नेते असो अशांची मोळी बांधून सत्तेचा सोपान मिळवण्याची सवय लागलेल्यांना लोककल्याणकारी विचारधारेचा पाया होता का मग विचारधारेशी निष्ठावान सहकाऱ्यांची मजबूत फळी कशी घडणार.
दुसरीकडे स्वतःला पार्टी विथ डिफरन्स समजणारा पक्ष 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे सोयीस्कर विसरत बकासुरासारखा खात सुटला आहे तेव्हा अशा प्रवृतीला अजिर्णतेचा आजार संभवतो. सतरंज्या उचलून वेगळ्या विचारांसाठी झटणारे व त्या पक्षाचा झेंडा घेतलेले जुने जाणते कार्यकर्ते या मेगा भरतीमुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक अन् अशा निष्ठावंताना गृहित धरून त्यांचे नेते राजकीय आखाडा तयार करीत असतील अन् बघा कोण कोणते पाटील अन् राजे आमच्या तंबूत येतात अशी शेखी मिरवत टाळ्या घेत असतील तर टाळ्या वाजवणारेच अशांना टाळा मारण्याची भाषा करतील. स्थानिक अन् स्थलांतरित हा वाद जिथे सर्व जगाला भेडसावतोय तो पक्ष पातळीवर पोचायला वेळ लागणार नाही अन् याची सुरुवात देखिल काही ठिकाणी झाली आहे. तेव्हा या पोटफुगीचा धोका स्वपक्षाला देखिल होऊ शकतो. स्थुल व कृश दोन्ही अवस्था शारीरिक दृष्ट्या अयोग्य तसेच संख्याबळाचा टोकाचा फरक हा देखील सुदृढ लोकशाहीला घातकच.
या साऱ्यात सध्या बघ्याची भूमिका घेणारे अन् उद्याचे तथाकथित मतदार राजे कोणता झेंडा घेऊ हाती म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे कोणता शिक्का मारू माथी विचारत फिरणार आहेत. मग मात्र आयता घरोबा मांडणाऱ्यांनी व तशा प्रकारची खेळी खेळणाऱ्यांनी राजकारणाचा कसा खेळखंडोबा चालविला आहे हे केवळ पाहण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)