वेगानं अन् त्वेषानं धावणारे जग.
सत्वहीन खाणं अन् तत्वहीन जगणं.
लायकी नसतानाही अती महत्वाकांक्षी असणारी लोकं.
प्रसिद्धी म्हणजेच यश अन् तथाकथित यशस्वी असणाऱ्यांनाच आदर्श समजणारा भवताल.
अती आरामाचे व्यसन अन् त्यासाठी तंत्रज्ञान अवलंबत्व.
माहिती म्हणजेच ज्ञान असा समज झाल्यामुळे सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान असल्याचा नव साक्षात्कार.
सगळ्यातलं सगळं कळतंय ही भावना.
माध्यमं नेहमीच समाजासाठी मुख्य अन् महत्वाचं प्रेरणास्रोत राहिलित परंतू माहितीचा केवळ प्रसार म्हणजे प्रज्ञावंत असल्याचा आभास निर्माण करणे अन् त्यातच रमणे.
मनोरंजन असो की प्रबोधन याचा येथेच्छ भडिमारामुळे आलेला उबग.
समाज चुटकी सरशी एवढा पुढारलाय की त्याला कोणत्याही समाज प्रबोधनाची गरज उरली नाही केवळ फायद्याच्या,आर्थिक उन्नती च्या वेगवेगळ्या क्लृप्त्या, फंडे यांचीच जास्त निकड भासतीय.
समोरासमोरचा संवाद, एखाद्या माणसा कडून प्रत्यक्षात ज्ञान घेण्यापेक्षा ऑनलाईन माहिती घेणे जास्त सोयीस्कर वाटते.
या पिढीला मग ती युवा असो, मध्यम वयीन असो की वृद्ध या तीन्ही टप्प्यातील लोकांना बांधून अन् पर्यायाने व्यापून टाकणारे तंत्र म्हणजेच हे मोबाईल नावाचं यंत्र होय.
यात अडकल्यामुळे हे जग धावतंय पण सध्याच्या या धावत्या जगाला उसंत हवीय का हा खरा प्रश्न आहे.














.jpeg)